असंख्य शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी अयोध्येकडे रवाना
ठाणे / प्रतिनिधी - आज ठाणे, कल्याण -डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, मीरा भाईंदर या शहराबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभू राम जन्मभूमी अयोध्याकडे दर्शनासाठी ठाणे, कल्याण या रेल्वे स्थानकातून रवाना झाले आहे. त्यावेळी ठाणे रेल्वे स्थानकात असंख्य शिवसैनिकांची गर्दी फलाटावर लोटली होती.
महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे रेल्वे स्थानकात युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत, खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी झेंडा दाखवून रेल्वे अयोध्येकडे रवाना करण्यात आली.