नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळवून देण्यासाठी केले दशक्रिया विधी आंदोलन

औरंगाबाद/ प्रतिनिधी - कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे अशा काळात नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देणे अत्यंत गरजेचे असताना सिडको वाळुज महानगर येथील आरोग्य केंद्र अनेक दिवसांपासून  बंद पडले आहे. हे आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी शिवसेना विभाग प्रमुख दत्तात्रय वरपे संबंधित विभागाला निवेदन दिले होते. परंतु  दिलेल्या निवेदनावर कुठलेही समाधानकारक उत्तर न दिल्याने सिडको विरोधात  शिवसेना विभागप्रमुख दत्तात्रय वरपे यांनी दशक्रिया विधी आंदोलन केले.

  या निवेदनात शिवसेना विभाग प्रमुख दत्तात्रय वरपे यांनीगेली काही वर्षे सातत्याने बंद असलेल्या सिडकोआरोग्य केंद्राकडे लक्ष देऊन तात्काळ सुसज्ज आरोग्य केंद्र सुरु नम्र विनंती केली आहे.नागरिकांच्या आरोग्याची होणारी हेळसांड आणि आरोग्य केंद्राची सुविधा देणे शक्य असूनही खाजगी दावाखाण्यांकडून होणारी आर्थिक लुट  याकडे लक्ष वेधले आहे.परंतु संबंधित विभागाचे  दुर्लक्ष बघुन हे आरोग्य केंद्र सिडकोने जाणीवपुर्वक बंद पाडले कि काय असा संशय येतो आहे. गोरगरीब नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नावर आपल्या संवेदना इतक्या बोथट कशा असु शकतात ? हा प्रश्न माझ्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना हैराण करतो आहे. त्यामुळे माझा नाईलाज होऊन आंदोलन करण्याशिवाय वेगळा पर्याय आपण शिल्लक ठेवलेला नाही. जेव्हा आपल्याला निवेदन दिले त्याचवेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मी एक निश्चय व्यक्त केला होता कि इतकी वर्षे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड करणाऱ्या सिडकोचा निषेध म्हणुन जोपर्यंत हे आरोग्य केंद्र सुसज्ज अशा पद्धतीने सुरु होणार नाही तोपर्यंत मी डोक्याला भगवा टिळा लावणार नाही आणि असे आम्ही हिंदु केवळ सुतककाळ सुरु असतानाच करतो याची कल्पना आपल्यालाही असावी. त्यामुळे आपल्या या असंवेदनशीलतेचा निषेध म्हणुन “दशक्रिया विधी आंदोलन करण्याचा निर्णय मला नाईलाजाने घ्यावा लागत आहे असे नमूद केले आहे.
  गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करून देखील सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर शिवसेना विभाग प्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी दि. 3 जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सिडको वाळूज कार्यालयासमोर दशक्रियाविधी आंदोलन केले.कोरोना काळात सिडको प्रशासनाच्या या बेजाबदारपणाची नागरिकांकडून निंदा केली जात आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा