संभाजीनगर नामकरणास स्थगिती शिवसेनेचे तीव्र आंदोलन
औरंगाबाद/ प्रतिनिधी - महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करून या प्रस्तावास मंजुरी दिली होती परंतु शिंदे, फडणवीस सरकारने संभाजीनगर नामांतराला स्थगिती देऊन विरोध दर्शविला आहे. या स्थगिती निर्णयाच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने दिनांक १६ जुलै शनिवार रोजी सकाळी १०:०० वाजता, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, टीव्ही सेंटर चौक या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात शिवसेनेचे सर्व उपशहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक तसेच समस्त हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे,मा. महापौर नंदकुमार घोडेले,उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, बप्पा दळवी, जयवंत ओक, आनंद तांदुळवाडीकर, विनायक पांडे, राजेंद्र राठोड, संतोष जेजुरकर, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड,शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाल कुलकर्णी, सुशील खेडकर,महिला आघाडीच्या संपर्क संघटिका सुनिता आऊलवार, सुनिता देव, जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, समन्वयक कला ओझा, उपजिल्हा संघटिका अनिता मंत्री, अंजली मांडवकर, मीना फसाटे, नलिनी बाहेती, जयश्री लुंगारे, दुर्गा भाटी, युवा सेना उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे ,शहर संघटिका प्राजक्ता राजपूत आशा दातार, विद्या अग्निहोत्री, भागुअक्का शिरसाट विधानसभा संघटिका लक्ष्मी नरहिरे, मीरा देशपांडे, नलिनी महाजन, तालुका संघटिका जयश्री घाडगे यांनी केले आहे.