यंदाच्या उन्हाळ्यात उच्चांकी तापमान चिकलठाणा वेधशाळेत नोंदले 40.2 अंश सेल्सिअस तापमान 

यंदाच्या उन्हाळ्यात उच्चांकी तापमान चिकलठाणा वेधशाळेत नोंदले 40.2 अंश सेल्सिअस तापमान 

औरंगाबाद : शहरात ऊन वाढले असून, शनिवारी तापमानाचा पारा चाळीशी पार गेला होता. चिखलठाणा वेधशाळेत शाळेचा 40.2 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे उच्चांकी तापमान ठरले आहे.

 शहरात मार्च महिन्यात तीन वेळा 40.0 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहिले. शहरात सकाळपासून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होत आहे. दुपारी उन्हाचे चटके अधिक होत असून ऊन कमी झाल्यानंतरही वातावरण उकाडा कायम आहे. उन्हाच्या तडाख्याने दुपारी घराबाहेर पडण्याची नागरिकांकडून टाळले जात आहे.

 मार्चमधील उष्णतेच्यालाटांनी नागरिकांना हैराण केले असनाच एप्रिल मध्ये ही कमाल तापमान सरासरीच्या पुढे राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहेएप्रिलच्या सुरुवातीलाच तापमान चाळीशी पार गेल्यानेत्याची सुरुवात झाल्याची परिस्थिती आहे. यंदाचा उन्हाळा अधिक धडक राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एप्रिल आणि मे दोन महिने घामाघूम करणारे ठरतील.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा