राष्ट्रवादी काँग्रेसचा पाण्यासाठी विराट घागर मोर्चा
औरंगाबाद / प्रतिनिधी - शहरात दिवसेंदिवस पाण्याची तीव्र टंचाई होत असून पाण्याचे वेळापत्रक पुर्णपणे निकामी झाले आहे.तसेच जायकवाडी सागरात मुबलक पाणीसाठा असून ही औरंगाबाद शहरात तीव्र पाणीटंचाई झालेली आहे.याला कारणीभूत हे भाजपाची पंचवीस वर्ष मनपात सत्ता असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला व पुर्वचे अध्यक्ष विठ्ठलराव जाधव यांनी केला.मनपाच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नसून प्रशासक शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्यास सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप कार्याध्यक्ष यांनी केला.
औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले जलसंकट नागरीकांचे होणारे हाल शहरात आठ दिवसांला होणारा पाणी पुरवठा या सर्व अडचणीं सोडविण्यात मनपा सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप व पुर्वचे आमदार हे निष्क्रिय असून त्यांना औरंगाबाद शहरातील नागरीकांचे हाल दिसत नसून ते फक्त भावनिक राजकारण करण्यात मश्गुल आहेत.असा आरोप प्रदेश चिटणीस प्रा.माणिकराव शिंदे यांनी केला.पाणी पुरवठा वेळेवर सोडविण्यात निष्फळ ठरलेल्या मनपा प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद पुर्व विधानसभे तर्फे अध्यक्ष विठ्ठलराव जाधव व कार्याध्यक्ष जावेद खान यांनी घागर मोर्चाचे आयोजन केले होते.त्याला शहरातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला.विशेष म्हणजे शेकडोंच्या संख्येने महिला या मोर्चात सामील झाल्या होत्या.
पुंडलिक नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात करण्यात आली.पोलिसांचा मोठा फौजफाटा यठिकाणी हजर होता.पुंडलिक नगर चौक ते हनुमान नगर पाण्याच्या टाकीपर्यंत मोर्चा काढण्यात आला.मनपा प्रशासक विरोधात घोषणा देण्यात आल्या.
हंडे व घागरी घेऊन मोर्चात
महिलांनी मातीचे मडके रोडवर फोडून मनपा प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त केला.पाण्याच्या टाकीजवळ पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता श्री पद्मे यांना निवेदन देण्यात आले.या मध्ये प्रामुख्याने दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा,नळाला येणारे अस्वच्छ पाणी बंद करण्यात यावा,शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावा.ज्या वसाहतीमध्ये नळ जोडणी नाही तेथे त्वरीत नळ जोडणी करून द्यावी.
शहराच्या साठ कि.मी.अंतरावर धरण असून देखील शहराला आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे ही लाजिरवाणी बाड आहे.शहराच्या नागरीकांना होणाऱ्या त्रासाला राष्ट्रवादी कदापी सहन करणार नाहीत.त्वरित मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मोर्चामध्ये प्रदेश चिटणीस प्रा.माणिकराव शिंदे,माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड,शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला,कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख,पुर्व विधासभा अध्यक्ष विठ्ठलराव जाधव,कार्याध्यक्ष जावेद खान,प्रसिध्दी प्रमुख तय्यब खान,युवती अध्यक्षा अंकिता विधाते, महिला अध्यक्षा मेहराज पटेल,विद्यार्थी अध्यक्ष अतुल राऊत, मा.नगरसेवक संगीता जाधव,अमोल जाधव, महिला अध्यक्षा मंजुषा पवार, जाधव,मा.नगरसेवक मोतीलाल जगताप,वैशाली पाटील,उपाध्यक्ष अनीसा खान,जी.के गाडेकर,रविंद्र तांगडे,कोकाटे मामा,अजमत पठाण,विलास डंगारे,शेख नवाज,रऊफ पटेल,जाकीर खान,शकीला खान,सलमा शेख,सुरेखा जगताप,फरहाना शेख,मुख्तार शेख,योगीता दुसरे,सुभद्रा जाधव,मंगल जाधव,उषा अंगारे,मोहम्मद हबीब,शेख मोहसीन,अनवर नवाब,अबरार पटेल,असद पटेल,शेख इरफान,शैलेंद्र खन्ना,तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.