डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उंचीमध्ये वाढ करण्यासाठी धरणे आंदोलन
औरंगाबाद/ प्रतिनिधी - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भडकल गेट जवळील पुतळ्याची उंची वाढवून भव्य असा पुतळा उभारण्यात यावा व त्याचे सुशोभीकरण करावे या मागणी करिता आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीतर्फे आज मनपा मुख्यलयासमोर धरणेआंदोलन करण्यात आले.
नगरसेवक मिलिंद दाभाडे यांच्या मागणीनुसार 2013 साली महापालिकेत भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवून देण्याच्या ठरावास महापौरांकडून मंजुरी देण्यात आली होती. परंतू, त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शिवाय पुतळ्यामधील तांत्रीक त्रुटींवर सभागृहात चर्चा होऊन,पुतळ्याच्या दिशेतला फरक, पुतळ्याच्या मानेचा भाग दिसत नसल्याने, सदरच्या पुतळ्याची उंची वाढविणे बाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे आंबेडकरी जनतेत असंतोष आहे. त्यामुळे आंबेडकरी समुदायाच्या भावना लक्षात घेऊन भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवून भव्यदिव्य पुतळा उभारावा हि विनंती. निवेदनाद्वारे मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांना करण्यात आली.