अखेर एमआयडीसी वाळूज मध्ये मोबाईल चोरणारे दोन चोर जेरबंद ; दोन चोरासह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

अखेर एमआयडीसी वाळूज मध्ये मोबाईल चोरणारे दोन चोर जेरबंद ; दोन चोरासह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

पुनम देसाई/ छत्रपती संभाजीनगर
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या विशेष कारवाईत तब्बल ८ मोबाईल फोन आणि एक दुचाकीसह २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून चोऱ्यांच्या मालिकेला आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
 रामेश्वर गाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शना प्रमाणे पो.स्टे.चे बिट अधिकारी व अंमलदार यांना सदर गुन्हयातील आरोपीतांची माहीती काढण्याचे आदेश दिले त्यावरुन बिट अधिकारी पोउपनि शेख सलीम सोबत पो अ सुरज अग्रवाल, सुरेश भिसे हे नमुद गुन्हयात आरोपीचा व गेले मालाचा शोध घेत असताना त्यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की सदरचा गुन्हा रांजणगाव शे.पु गावातील शांतीनगर भागात राहणारा इसम नामे विक्की जाधव याने त्याचे साथीदारांसह केला असुन तो रांजणगाव फाटा परिसरात त्याचेकडे असलेल्या मोबाईलची विक्री करण्याचे उद्देशाने एका दुचाकीवर उभा आहे असे खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन ते सदर ठिकाणी जाऊन तेथे बातमीतील वर्णणाचा इसम उभा असल्याचे दिसल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याचे हातात असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात 1,80,000/-रुपये किंमतीचे एकुण 08 मोबाईल हॅण्डसेट, 80,000/- रु. किंमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल मिळून आली. त्याबाबत आरोपीस विचारपूस केली असता त्यांनी काही एक समाधान कारक उत्तर दिले नाही. त्यावरून त्यांच्या ताब्यात मिळालेले मोबाईल व दुचाकी चोरीची असल्याचा संशय बळावला त्यावरून त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यात मिळून मोटर सायकल क्रमांक MH 20 GS 3377 हि गुन्हा करताना वापरल्याचे निष्पण झाले. त्यामुळे सदर दुचाकी जप्त करण्यात आली आहे. नमुद आरोपीतांनकडून मोबाईल चोरीचे व मोटर सायकल चोरीचे इतर गुन्हे उघडकीन येण्याची शक्यता असुन त्याचे इतर 02 साथीदारांचा शोध चालु आहे. पुढील तपास सफौ जाधव हे करत आहेत.

सदरची कामगिरी  पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोउपनि शेख सलीम, पोअ सुरज अग्रवाल, पोअ  सुरेश भिसे, पोअ  जालींदर वाखुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा