चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद
एखाद्या व्यक्तीच्या अपहरणाचे किस्से आपण अनेकदा ऐकले असतील. चित्रपटातसुद्धा अपहरणाचे सीन दाखवले जातात. पण प्रत्यक्षात अपहरण करतानाचा क्षण कधी अनुभवलाय का? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एका लहान मुलीचे अपहरण होत आहे.
व्हायरल होत असलेल्या थरारक घटनेमध्ये एक बाप आपल्या चिमुकलीला हातात धरून चालला आहे. तर अपहरणकर्ता चिमुकलीच्या गळ्याला चाकू लावून तिला घेऊन चालला आहे. चिमुकलीचा बापही त्याच्याबरोबर चालला आहे. पण चिमुकलीच्या गळ्याला चाकू असल्यामुळे बापाला काहीच करता येत नाही दरम्यान, पुढे गेल्यानंतर पोलीस त्याच्या मदतीला धावून येतात. पोलीस आल्यानंतर अपहरणकर्ता आपल्या हातातील चाकू खाली ठेवतो आणि हात वर करून आपल्याला पोलिसांच्या हवाली करतो. त्यानंतर पोलीस आणि स्थानिक लोकांनी त्याला चांगलंच मारलं आहे. या घटनेचा थरार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.