खा.रावसाहेब पाटील दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी - राजे छत्रपती पॅरामेडिकल & नर्सिंग कॉलेज माहोरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन जालना सह डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, जेजे प्लस हॉस्पिटल ब्रेन स्पेशालिस्ट संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय रेल्वे व कोळसा खाणमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान उपचार मोफत शिबिराचे आयोजन माजी सरपंच आसई तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा सदस्य संजय गांधी निराधार अनुदान योजना तहसील जाफराबाद विलास पाटील इंगळे, राजे छत्रपती पॅरामेडिकल & नर्सिंग कॉलेज माहोरा येथे करण्यात आले होते.
यावेळी नव्याने स्थापन झालेले नर्सिंग कॉलेज व शिबिराचे उद्घाटन रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते तालुक्यातील हजारो लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले. जाफराबाद तालुक्यातील रोगनिदान शिबिराला उपस्थित बांधवांना संबोधित करताना ते म्हणाले की,देशामध्ये जास्तीत जास्त खर्च रुग्णांच्या आजारावरती करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निधी पुरवत असतात. आपण सीएसआर फंडातून जास्तीत जास्त रुग्णांना मोफत उपचार कसे करता येईल याच्यासाठी प्रयत्न करू. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विलास पाटील इंगळे यांनी समाज उपयोगी उपक्रम करून समाजामध्ये एक वेगळा पायंडा पडण्याचं काम या ठिकाणी केलं. ही कौतुकास्पद बाब आहे. आज आपण दैनंदिन जीवन जगत असताना स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे. परंतु काही लोकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याकारणाने संभाजीनगर सारख्या ठिकाणी जालना सारख्या ठिकाणी रुग्णांना जाता येत नाही.असे तज्ञ डॉक्टर या शिबिराच्या माध्यमातून माहोरासारख्या खेड्या गावामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेत. त्यामुळे या हजारो लोकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. येणाऱ्या काळात पदाधिकाऱ्यांनी असेच समाज उपयोगी उपक्रम राबवावे.असे संबोधन माननीय केंद्रीय मंत्री दानवे दादा यांनी जन समुदायाला संबोधित केले. यावेळी मा. आमदार संतोष पाटील दानवे तालुकाध्यक्ष सुरेशजी दिवटे, संभाजीनगरचे जि.परिषद गटनेते अनिल भैय्या चोरडिया, जि. परिषद सदस्य गजानन नांदुरकर, आशाताई पांडे , जिल्हा चिकित्सक जालना रुग्णालयाच्या अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे, जिल्हा अतिरिक्त शालेय जालना डॉ. प्रताप घोडके. संभाजीनगरचे सृष्टी हॉस्पिटलचे डॉ. संजय पगारे, विजय नाना परिहार चेअरमन जि.परिषद सदस्य संतोष लोखंडे, जी. प.सदस्य राजेश जी चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित, नर्सिंग कॉलेज असोसिएशन राज्य सचिव शंकरराव अडसूळ, कृषी बाजार समिती सभापती गोविंदराव पंडित, आमदार स्वीच सहाय्यक उद्धवराव दूनगहू माजी सभापती दगडू गोरे, माजी सभापती साहेबराव मामा कानडजे, माजी सभापती भाऊसाहेब जाधव, उपसभापती साहेबराव लोखंडे, माजी सभापती अनिल चोतमोल, नाना भागिले, सरपंच मधुकराव गाढे, मेडिकल असोसिएशन अध्यक्ष एकनाथराव घाडगे, भगवानराव लहाने, राजेश मस्के, सरपंच बजरंग दादा बोरसे, सुरेश मस्के, अरुण अवकाळे, संतोषराव इंगळे, डॉ. रवींद्र कासोद, सरपंच गजानन लहाने, गजानन घाडगे, अनिल बोर्डे, नगरसेवक उपसभापती जगन पंडित, गजानन गारडे, (श्रीराम बिल्डर्स) डॉ. कैलास देशमुख, डॉ. रामेश्वर राऊत, प्रा. राहुल पवार, कडूबा शितोळे, विजय कड, शेख कौसर, सरपंच विजय इंगळे, अवचितराव दळवी, इत्यादी सह पंचक्रोशीतील सर्व सरपंच उपसरपंच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये डॉ. जीवन राजपूत जे जे प्लस हॉस्पिटल संभाजीनगर येथे मेंदू आणि मनका हृदय आजार व मुतखडा असे 42 ऑपरेशन्स योजनेअंतर्गत मोफत होणार आहे. तसेच लॉयन्स नेत्र क्लब संभाजीनगर यांच्या माध्यमातून मोतीबिंदूचे 41 ऑपरेशन मोफत होणार आहे व बाकी वेगवेगळ्या आजारावर तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत हजारो नागरिकांचे उपचार घेतले व त्यांना शिबिरामध्ये मोफत मेडिकल , पुलाव नाश्ता ,वाटप करण्यात आले. तसेच रक्त व लघवी विभागांतर्गत 26 जणांना शुगरची नवीन लागण झाली असे कळाले. या कार्यक्रमासाठी सहकार्य विलास कोल्हे, विक्रम ठाकूर, संदीप पोटे, दादाराव गडकरी अण्णा पा., विशाल इंगळे, पंडितराव इंगळे, मुरलीधर डहाके, विजय सोनुने, भास्कर जाधव, गणेशराव पोपळघट, बाजीराव गाडे, रुग्णसेवक विशाल पिंपळे यांच्यासह अनेकांनी केले.
या शिबिरामध्ये माहोरा पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील हजारो लोकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते कृष्णा पाटील इंगळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कृष्णा कोरडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजे छत्रपती पॅरामेडिकल अँड नर्सिंग कॉलेजच्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.