मोफत कर्करोग निदान चाचणीचे आयोजन

मोफत कर्करोग निदान चाचणीचे आयोजन

संभाजीनगर /प्रतिनिधी - सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी शासकिय उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर येथे मोफत कर्करोग निदान चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोफत तपासणी कामी छत्रपती संभाजीनगर जिल्हयातून कर्करोग निदान मोबाईल व्हॅन व तज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित राहणार आहे.

शहरातील ३० वर्षावरिल सर्वच महिला-पुरुषांना आवाहन करण्यात येते कि आपल्या शहरातील शासकिय उपजिल्हा रुग्णालयात या कर्करोग मोबाईल व्हॅन तपासणी मोहिमेचा आवर्जून लाभ घ्यावा.

आज रोजी कर्करोगग्रस्त रुग्णांचे प्रमाण प्रगत तसेच शहरी भागात वाढत आहे. असंसर्ग आजारांची झपाट्याने वाढ होत असून जवळपास ६३ टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य रोगामुळे होतात. त्यापैकी कर्करोगामुळे होणा-या मृत्यूंचे प्रमाण ९ टक्के आहे. ग्लोबोकॅन २०२० च्या सर्वेक्षणानुसार कर्करोगाचे १३लक्ष २४ हजार रुग्ण आढळून आले आहे. महाराष्ट्र राज्यात मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग हे तीन सर्वात जास्त आढळणारे कर्करोगग्रस्त आहेत. तसेच एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत २६.३ टक्के मूख कर्करोगग्रस्त, स्तनाचा कर्करोग ७७.९ टक्के तर सर्वायकल कर्करोगाचे एकूण ५०.२ टक्के रुग्ण आढळले आहेत.

प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाय हे धोक्याच्या घटकास प्रतिबंध घालून नवीन उदभवणा-या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यात सहाय्यक ठरत आहेत.यामध्ये तंबाखुसंबंधी कर्करोग, तोंडाचा कर्करोग, तोंडाचा, स्तनाचा, गर्भाशय मुख कर्करोग, सामान्य कर्करोग, पसरलेले व अंतिम टप्यातील कर्करोगाचे निदान चाचणी करण्यात येणार आहे.

या तपासणी मोहिमेत सामाजिक, राजकिय शैक्षणिक, पत्रकारिता व विविध क्षेत्रातील मान्यवर व आजी माजी पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून तपासणी मोहिमेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मा. वैद्यकिय अधिक्षक डॉ.बी.एन. मोरे शासकिय उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा