मोबाईलसाठी घेतला आत्ये्भावाचा जीव

मोबाईलसाठी घेतला आत्ये्भावाचा जीव
मयत अंकुश म्हैसमाळे

फोटो काढण्याच्या बहाण्याने विहिरीढकलले, त्या.नंतर डोक्यात घातला दगड


वाळूज/प्रतिनिधी  - नातवाला आजोबांनी घेऊन दिलेल्या मोबाईलसाठी मामेभावानेच आत्याा भावाचा विहिरीत ढकलून आणि त्यापनंतर डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे दोघेही अल्पवयीन आहेत. आजोबांनी आत्या भावाला दिलेला मोबाईल आपल्याला मिळावा यासाठी , १७ वर्षीय मामेभावाने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण एमआयडिसी पोलीस ठाणे हद्दीत ३ डिसेंबर रोजी ढोरकिन-बालनागर रोडवरील एका विहिरीत अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान वाळूज पोलीस स्टेशनला २ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असल्याचे समोर आले. हा मृतदेह अंकुश प्रल्हाद म्हैसमाळे (१६, रा. शेंदूरवादा गाव, वाळुज) याचा असल्याचं स्पष्ट झालं. वाळूज पोलिसांनी तपासाचीचक्रे फिरवून अंकुशचा खून त्या च्याव मामे भावानेच केला असल्याचं समोर आलं. आजोबांनी दिलेला मोबाईल आपल्याला मिळावा म्हणून अल्पवयीन मामेभावाने आत्या  भावाचा खून केल्याचे स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी आता वाळूज पोलीस पुढील तपास करत आहे.
मोबाईलसाठी बिर्याणी दारूचा रचला कट...
मयत तरुण आणि आरोपी दोन्ही आत्या-मामा भाऊ असून दोघेही अल्पवयीन आहेत. तर मयत तरुणाला त्याच्या आजोबांनी मोबाईल घेऊन दिला होता आणि तोच मोबाईल आरोपी अल्पवयीन मुलाला हवा होता. त्यासाठी त्याने कट रचला आणि मामे भावाला बिर्याणी आणि दारू पाजतो म्हणून पैठण तालुक्यातील बिडकीन गावात घेऊन गेला. तिथे बिर्याणी आणि दारू घेतल्या नंतर ते दोघे बालानगर रोडवर असलेल्या एका विहिरीवर गेले. तेथे त्यांेनी दारु पिल्यानंतर बिर्याणी खाल्ली. त्यारचवेळी आरोपीने तुझे फोटो काढतो म्हणून मामेभावाला विहिरीच्या काठावर उभं केलं आणि ढकलून दिलं. त्यानंतर ही आतेभाऊ वरती येत असल्याचे पाहून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. भाऊ मयत झाल्याची खात्री होताच तेथून अल्पवयीन आरोपीने पळ काढला. 

मोबाईलवरील संभाषणावरून लागला तपास...
आत्येलभावाला आजोबांनी घेऊन दिलेला मोबाईल मिळवण्यासाठी मामेभावाने रचलेल्या कटाप्रमाणे आतेभावाने शेदुंरवादा गावात गेल्यानंतर आत्येोभावाला कॉल केला. तोच कॉल शेवटचा होता, या कॉलवरूनच पोलिसांनी या खूनाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी आतेभावाला ताब्यात घेतले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा