ऐन दिवाळीतच मालमत्तांवर कारवाई मनपा आयुक्तांचे नवे आदेश

औरंगाबाद/ प्रतिनिधी - नागरिकांनी 31 ऑक्टोंबर पर्यंत गुंठेवारी कायद्यांतर्गत मालमत्तेचे नियमितीकरण करून न घेतल्यास त्या सर्व मालमत्तांवर मनपा हातोडा चालवणार  आहे असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाने गुंठेवारी कायद्यांतर्गत कमर्शियल, नॉन रेसिडेंशियल व रेसिडेन्शियल या सर्व मालमत्तांना नियमित करण्याची सुविधा दिली असून ३१ ऑक्टोंबर पर्यंत नागरिकांनी या सर्व मालमत्ता नियमित करून न घेतल्यास एक नोव्हेंबरपासून महानगरपालिका अशा मालमत्तांना जमीनदोस्त करणार असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. म्हणजे ऐन दिवाळीच्या तोंडाशीच लोकांच्या मालमत्तांवर मनपा कारवाई करणार हे निश्चित. 1 नोव्हेंबर पासून दिवाळी सुरू होणार असून लोकांनी सण साजरा करावा कि या कारवाईला तोंड द्यावे असा मोठा प्रश्न आता नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
       नुकताच कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे दोन वर्षानंतर  दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करण्यासाठी औरंगाबादचे नागरिक तयार झाले असतानाच मनपा आयुक्तांचे आदेश त्यांच्या आनंदावर विरजण टाकणारे ठरणार की काय अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा