जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेवर पुन्हा जय भद्रा पॅनलचे निर्विवाद वर्चस्व
औरंगाबाद / प्रतिनिधी - जिल्हा ग्रामसेवकाची सहकारी पतसंस्था निवडणूक 2022 नुकतीच पार पडली असून औरंगाबाद जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेवर पुन्हा जय भद्रा पॅनलचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले आहे.
संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल जी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ,राज्य सल्लागार शिवाजी सोनवणे, संघाचे उपाध्यक्ष ए आर गायकवाड, यांचे सह पॅनल प्रमुख बी आर दाणे पाटील , गंगाधर हारदे प्रवीण नलावडे , पी एस पाटील ,संभाजी बनकर ,आसाराम बनसोड ,यांच्यासह सर्व संघटना प्रतिनिधी यांनी जवळपास बिनविरोध च्या जवळ नेऊन ठेपलेली निवडणूक दिनांक 8 .5 .2022 रोजी जय भद्रा पॅनलच्या सर्व च्या सर्व उमेदवार यांना मोठ्या फरकाने विजयी करून निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध केले.
सर्वसाधारण मतदारसंघातून रमेश मुळे, सुनील राकडे,गणेश धनवई,अशोक काळे, अजयकुमार ठाकरे,हरुण तडवी, नितीन निवारे, संतोष मरमट,अवचित राऊतराय, जनार्दन शिंदे, हे मोठ्या फरकाने निवडून आले.अनुसूचित जाती मतदारसंघातून सागर डोईफोडे व इतर मागास वर्ग मतदारसंघातून रामकृष्ण निकम इत्यादी उमेदवार शेकडोंच्या फरकाने निवडून आले, त्याचप्रमाणे विमुक्त भटक्या जाती मधून अरुण शंकरराव चव्हाण महिला राखीव मधून छाया जाधव ,गोखले कल्पना या अविरोध यापूर्वीच निवडून आल्याने सर्व 15 जागेवर जय भद्रा पॅनलचे वर्चस्व निर्माण झाले त्यामुळे जल्लोष साजरा करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामसेवकाची एकमेव पतसंस्था असून जय भद्रा पॅनल वर सभासदांनी विश्वास ठेवून पुन्हा सेवेची संधी दिल्याबद्दल सर्व संचालक मंडळाने मतदारांचे जाहीर आभार व्यक्त केले.
ग्रामसेवक वर्गाच्या विकासासाठी पुढील पाच वर्ष प्रामाणिकपणे भरीव कार्य करणार असल्याचे आश्वासन उमेदवारांचे प्रतिनिधी नवनिर्वाचित संचालक रमेश मुळे यांनी यावेळी दिले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन 136, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ याचे सर्व विभागीय,जिल्हा , तालुका, पदाधिकारी यांच्यासह राज्य युनियनचे माजी राज्य अध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष एलजी गायकवाड, राज्याचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे ,सरचिटणीस प्रशांत जामोदे , कोषाध्यक्ष संजय निकम यांच्यासह सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवनिर्वाचित संचालक रमेश मुळे यांनी माझा ग्रामसेवक - माझा सभासद धोरण राबिवणे,कर्जावरील व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे ,भाग भांडवल वाढवणे, आकर्षक सवलत देऊन ठेवी वाढविणे,प्रत्येक सभासदास सवलती देऊन पाल्याच्या भविष्यासाठी योजना तयार करणे,पतसंस्थे साठी सुसज्ज भव्य अशी इमारत उभी करणे , सभासदाच्या पाल्यासाठी अभ्यासिका- निवासी वसतिगृह उभारणे, बाहेर गावाहुन आलेल्या सभासद बांधवांना तात्पुरते विश्राम गृह बांधणे, मंगल प्रसंगी हॉल उपलब्ध करून देणे, इत्यादी मा एल जी गायकवाड यांचे मार्गदर्शन खाली पतसंस्था कार्य करणार असे आश्वासन दिले.