प्रवक्ता निवडीसाठी युथ कॉग्रेसची ' यंग इंडिया के बोल 'स्पर्धा - जयेश गुरणानी

प्रवक्ता निवडीसाठी युथ कॉग्रेसची ' यंग इंडिया के बोल 'स्पर्धा - जयेश गुरणानी

औरंगाबाद / प्रतिनिधी -   महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसची बाजू समाजासमोर आणि माध्यमासमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी दी. 29 मे रोजी प्रवक्त्यांची निवड करण्याचा निर्णय प्रदेश युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष कुणाल राऊत यांनी घेतला आहे. खासदार राहुल गांधी याच्या मार्गदर्शनात व भारतीय युवक कॉग्रेसचे राष्टीय प्रभारी कृष्णा आलवारूजी व युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रवक्त्यांच्या निवडीसाठी युवक कॉग्रेसने स्पर्धेचे आयोजन केले    असल्याची घोषणा राष्ट्रीय प्रवक्ते व या स्पर्धेचे महाराष्ट्राचे प्रभारी जयेश गुरणानी यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. युवक कॉग्रसतर्फे 'यंग इंडिया के बोल हे अभियान राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येत असून, या माध्यमातून जिल्हास्तरावर स्पर्धा घेऊन त्यातील सर्वोत्तम पाच स्पर्धकांना युवक काँग्रेसच्या यंग इंडिया के बोल' उपक्रमांतर्गत वक्तृत्व जिल्हा प्रवक्तेपदी नियूक्ती मिळणार आहे, अशी माहिती राज्य प्रवक्ते हनुमंत पवार यानी दिली.राज्य व राष्ट्रीय प्रवक्त्यांची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी निःपक्षपातीपणे निवड करू शकणाऱ्या पंचांची नेमणुक करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस चे सरचिटणीस अभिजीत चव्हाण यांनी दिली.

याच पद्धतीने याप्रसंगी. अजय भुजबळ, राहुल टेकाळे, प्रदेश सचिव इरफान पठाण, इद्रीस नवाब, शोएब अब्दुल शेख, सिंधू पवार, सृष्टी तायडे, अमित जाधव, शाहरुख शेख, फैज सरवर शेख, सुमेध नारनवरे आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी युवकांनी 9823516002 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन औरंगाबाद युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष वरून पाथ्रीकर, शहर अध्यक्ष सागर नागरे यांनी केले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा