पोलीस भरती घोटाळा प्रकरणात धक्कादायक नवा खुलासा

पोलीस भरती घोटाळा प्रकरणात धक्कादायक नवा खुलासा


औरंगाबाद / प्रतिनिधी - पोलीस भरतीत घोटाळा प्रकरनात औरंगाबादचं कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2021 अखेरच्या तीन महिन्यात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षेत उमेदवारांकडून 15 ते 17 लाख रुपये घेण्यात आले. ज्यांनी पैसे दिले त्यांच्या लेखी आणि शारीरिक परीक्षेला वेगळ्याच उमेदवारांना बसविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही टोळी उमेदवाराला पास करून देण्यासाठी बोगस उमेदवाराचा वापर करत होती. 

दरम्यान, या प्रकरणी प्राथमिक अहवालात 8 जनांचा समावेश असल्याचे समोर आले असून आणखी 20 आरोपींचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील एजंट 15 ते 17 लाख रुपये घेऊन अवैध पद्धतीने पोलिसांत भरती करत असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर 100 जणांना अवैधपणे पोलिसांत भरती करण्याचे टार्गेट असल्याचे आढळले आहे. तसेच, पोलीस विभागासह अन्य इतर शासकीय विभागात अवैधपणे भरती केल्याचे समजले आहे. 

औरंगाबाद रॅकेटने पुणे, ठाणे,पिंपरी चिंचवड सह अनेक ठिकाणी अशी बनवेगिरी केली आहे. कोरोनामुळे चेहऱ्यावर मास्क असल्याने खरा उमेदवार ओळखणे अवघड असल्याचा फायदा घेत परीक्षेत डमी उमेदवार बसवण्यात आले होते. राज्यातील इतर भागातही पोलीस भरती प्रक्रियेत घोटाळा झाला असण्याची शक्यता असून यात बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असू शकतो. पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा