महापालिकेची नवीन युक्ती दिवसा ऐवजी रात्री कारवाई

औरंगाबाद/ प्रतिनिधी - शहरातील रस्त्यावर रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या दुकाने, टिन शेड व विविध अतिक्रमणे काढण्याची कारवाई सध्या महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकांनी संध्याकाळी सुरू केली असून,या विषयी अधिक माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी दिली.


शहरात मुख्य बाजार पेठ आणि मुख्य रस्त्यावर संध्याकाळच्या वेळेस अनेक ठिकाणीं दुकानदार रस्त्यावर गाड्या व आस्थपना मधील सामान वस्तू मांडून विक्री करत असतात.मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई फक्त दिवसा करत असल्याने दुकानदार रात्री बिनधास्त पणे दुकाने थाटून रहदारी व पादचारी येण्या जाण्यास अडथळा निर्माण करत असतात. त्यामुळे अनेक किरकोळ अपघात आणि व्यापारी व दुचाकी वाहन धारकात भांडण होते.तसेच पादचारी, वाहनधारकांना रस्त्यावर चालणे मुश्किल होते.

 त्यामुळे महानगरपालिका प्रशासकीय विभागाने गेल्या 3 ते 4 दिवसापासून  अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने शहरातील विविध भागात रात्रीच्या वेळेस कारवाई सुरू केली आहे.शुक्रवारी मोती कारंजा, रविवार बाजार रोडवरील अनेक दुकान, रस्त्यावर लावलेले कुलर व इतर सामान जप्त करत कारवाई केली. या कारवाई दरम्यान अनेक दुकानधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला ,परंतु अतिक्रमण हटाव पाथकांनी समजून सांगत कारवाई पार पाडली .
<span;>या वेळी मनपा अतिरिक्त आयुक्त निकम यांनी नागरिकांना व आस्थपना धारकांना रस्त्यावर अतिक्रमण करू नये असे आवाहन केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा