महापालिकेचा एक नवीन मोठा उपक्रम नैसर्गिक आपत्तीशी सामना करायला औरंगाबाद तयार
औरंगाबाद /प्रतिनिधी - पर्यावरणातील बदल हवामानातील बदलास कारणीभूत ठरत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे हवामान असुंतलित झाले आहे. अतिवृष्टी वाढीव तापमान, दुष्काळ, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपत्तींना लोकांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या या सर्व अडचणी दूर करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी ने वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, इंडिया (डब्लू आर आय) या संस्थेला शहराचा हवामान कृती आराखडा तयार करण्यासाठी नियुक्त केले आहे. या संदर्भात बुधवारी एक करार करण्यात आला. हा करार महाराष्ट्र शासन व चिल्ड्रेन इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन यांच्या सहकार्याने झाला आहे.
मनपा आयुक्त व प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी चे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांनी बुधवारी डब्लु आर आय चे प्रतिनिधींशी ऑनलाइन माध्यमाने चर्चा केली. त्या वेळेस डब्लू आर आय च्या लुबैना रंगवला यांनी सांगितले की अतिवृष्टी, वाढीव तापमान, वळवांटीकरण, दुष्काळ, ढगफुटी हे सर्व हवामान बदल मुळे होतात.याला वेळेवर आला घालण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रमाची गरज आहे, त्या म्हणाल्या. आणि यामुळेच डब्लू आर आय औरंगाबाद शहरासाठी हवामान कृती आराखडा तयार करू इच्छितो.
हवामान कृती आराखडा चे दोन मुख्य भाग आहेत. पहिला की जे प्रदूषण झाले आहे त्याला कमी करणे आणि दुसरा शहर आणि नागरिकांना हवामान बदल साठी तयार करणे. डब्लू आर आय औरंगाबादला केंद्र शासनाच्या क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क मध्ये सुधारित स्थान प्राप्त करण्यासाठी ही सहकार्य करेल. झालेल्या करारानुसार डब्लू आर आय औरंगाबाद शहराला 2023 पर्यंत पांच टप्यात 30 वर्षाचा कृती आराखडा तयार करून देईल.
आयुक्त पाण्डेय यांनी करारावर सही केल्यानंतर ते म्हणाले की मनपा एक समर्पित हवामान बदल विभाग बनवणार आहे. "या विभागाचा कार्यभार उपायुक्त स्तराचे अधिकारी सांभाळतील. विभागाचे उद्घाटन महाराष्ट्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात होणार आहे. या विभागाचे कार्य माहिती संकलन पासून सुरू होणार आहे.
या वेळेस शहर अभियंता सखाराम पानझडे, स्मार्ट सिटी चे आदित्य तिवारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.या आराखड्या मुळे शहराला केंद्र आणि राज्य शासनाचा विविध योजनेअंतर्गत हवामान बदलावर काम करण्यासाठी निधी प्राप्त करण्यासाठी मदत होईल. चिल्ड्रेन इंवेस्टमेंट फंड फाउंडेशन यांचे ही या कार्यासाठी आर्थिक सहकार्य लाभलं आहे.