भर रस्त्यावर तरुणाला भोसकले प्रकृती चिंताजनक
औरंगाबाद/ प्रतिनिधी- ओळखितील तरुणाने फोन करून भेटायला बोलवले.यावेळी पाच ते सहा जणांनी वाद घालत २५ वर्षीय तरुणाला चाकूने सपासप वार करत गंभीर जखमी केले.मारहाण करणारे घटनास्थळावरून पसार झाले यावेळी त्याला मित्राच्या मदतीने तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.ही घटना शनिवार दि.८ रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास बाबा पेट्रोल पंप ते कार्तिक चौक मार्गावर घडली.
शुभम दिलीप बागुल (वय२५,रा. बालाजी नगर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.शुभम हा पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे.दरम्यान शनिवार दि.८ रोजी शुभम घरी असताना त्याला धुळ्यातील हरीश चौधरी या मित्राचा फोन आला.यावेळी त्याने मला मदत हवी आहे तू लगेत भेटायला ये म्हणून बोलवले.शुभम सोबत किरकोळ कारणावरून वाद करायला सुरुवात केली.शुभम समजाऊन सांगत असताना चार ते पाच जणांनी सपासप चाकूने त्याला भोसकेले. जखमी शुभमला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे.