भाजप उपसरपंचावर जीवघेणा हल्ला
बीड /प्रतिनिधी - राष्ट्रवादीच्या गटाकडून भाजप उपसरपंचावर जीवघेणा हल्लाकेल्याची धक्कादायक घटना बीडमधील लिंबागणेश येथे घडली आहे. हल्ल्यात उपसरपंच गंभीर जखमी झाल्याने बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मारहाण करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, संबंधित घटनेचा पोलिस तपास करत आहेत.
बीड जिल्ह्यात नुकत्याच 671 ग्रामपंचायतींची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामध्ये बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असताना ईव्हीएम मशीनमध्ये फेव्हिक्विक टाकल्याचा प्रकार घडला. त्यामुळे पुन्हा मतदान प्रक्रिया करून मतदान घ्यावे लागले होते. याच गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या उपसरपंचावर जीवघेणा हल्ला रात्री केला. हा वाद निवडणुकीच्या कारणावरून झाला असल्याचे सांगितले जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीतील कुरापत काढून जवळपास 20 जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी मिरची पावडर अंगावर टाकून हॉकी स्टिक, बेल्ट आणि लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर उपसरपंच वाणी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार देखील झाला. मात्र, परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले आहेत. मारहाण करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पाटोदा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
लिंबागणेश ग्रामपंचायततील प्रभाग क्रमांक 2 येथे बी यु पी नंबर 43461 च्या बटणावर फेविक्विक टाकून ते बटन बंद करण्यात आले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर दुसरी बॅलेट युनिट मशीन सुरू करण्याच्या प्रक्रियेला 1 तास 25 मिनिटे कालावधी लागला होता. झोनल अधिकारी व केंद्राध्यक्ष यांनी बॅलेट युनिट क्रमांक पी 38450 हे दुसरे मशीन जोडून मतदान प्रक्रिया सुरू केली होती. परंतु या मतदान केंद्रावर इतर दोन केंद्रापेक्षा कमी मतदान झाले असल्याने ही बाब राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात आली होती. त्यानंतर प्रभाग क्रमांक 2 मध्ये फेरनिवड घेण्याचा आदेश राजे निवडणूक विभागाने जिल्हा प्रशासनाला दिला होता. त्यानुसार २३ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक 2 साठी फेर मतदान घेऊन त्याची मत मोजणी झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचि प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक २६ डिसेंबर आहे. दरम्यान, याप्रकरणी केंद्रप्रमुखाच्या फिर्यादीवरून ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे.
मागे सरपंचावर झाला होता हल्ला: निवडणुकीच्या कारणावरून लिंबागणेश याच गावात वाद झाला नाही तर मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माळापुरी या गावात चक्क सरपंचावर हल्ला केला होता व त्याच दिवशी खामगाव येथेही असाच प्रकार झाला होता त्यानंतर बीड जिल्ह्यात निवडणुकीच्या कारणावरून अनेक ठिकाणी भांडण झाले अनेकजनाना दुखापती ही झाली होती त्यामुळे हे वाद आता कधी संपणार हाच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.