रेल्वेला भीषण आग जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या
अहमदनगर /प्रतिनिधी - अहमदनदर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत रेल्वेचे तीन ते चार डब्बे जळून पूर्ण खाक झाले आहेत. अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेला आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी उड्या मारुन आपला जीव वाचवला आहे. आगीमुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. कोणी प्रवाशी आतमध्ये अडकलाय का हे तपासलं जात आहे. सदर घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
शिराडोह परिसरात ही आग लागल्याची माहिती आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस आणि रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तीन-चार डब्यांना भीषण आग लागल्याचं समजतंय. आग वाढू नये यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे.