आ. अंबादास दानवे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आनंदात साजरा
औरंगाबाद/प्रतिनिधी - आ. अंबादास दानवे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आनंदात साजरा झाला. दक्षिणमुखी मारुती मंदिर येथून आरती करून वाजत गाजत, आतिषबाजी करत छोटेखानी मिरवणूकीचे रुपांतर हर हर महादेव मंदिर येथे मोठ्या सभेत झाले. यावेळी ठीकठिकाणी महिला भगिनींनी दादांचे औक्षण केले.
यावेळेस 30 गरजू मुलींना सरपंच सचिन गरड, तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, शहरप्रमुख श्रीकांत साळे, उपसरपंच उषाताई हांडे,ग्रा.पंचायत सदस्य मंदाताई भोकरे,बबन सुपेकर यांच्या सौजन्याने सायकल वाटप केल्या. येणाऱ्या काळात शिवसेने तर्फे सम्पूर्ण जिल्हात ही लोकोपयोगी मोहीम राबवली जाईल अशी ग्वाही आमदार दानवे साहेबानी दिली..!!! कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सचिन गरड यांनी प्रास्ताविक मांडले. सूत्रसंचालन विशाल खंडागळे यांनी केले. यावेळी महिला आघाडीच्या जयश्री घाडगे, सुनीता जाधव, कदम ताई,सोनवणे ताई तसेच उद्योजक कैलास भोकरे, गणेश नवले, मनोज गायके, पोपट हांडे,वळदगावचे सरपंच अमर राजपूत,युवासेना शहर प्रमुख सागर शिंदे, किशोर खांडरे,सूरज वाघ, मंगेश चक्कर, बापू चव्हाण, विष्णू जाधव, अण्णा खांडेकर, ज्ञानेश्वर गायकवाड, शिवाजी गायकवाड, रवी पाईकराव महादेव मंदिर चे सर्व ट्रस्टी,परिसरातील महिला भगिनी ,आबालवृद्ध ,नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.