मनपा अतिक्रमण हटाव पथकाची धडक कारवाई
औरंगाबाद/ प्रतिनिधी - सिटीचौक ते नौबत दरवाजाच्या किलेआर्क पंचकूआ परिसरातील मंजूर डी पी रस्त्यावर असलेले बांधीत मालमत्ता व इतर अतिक्रमण मनपा अतिक्रमण हटाव पथकाने आज पोलीस बंदोबस्तात कारवाई करत जमीनदोस्त केले .
सिटी चौक ते किलेआर्क नौबत दरवाजा शासनाच्या 152 कोटी रुपयांतुन 100 फुटाचा सिमेंट रस्ता विकास आराखड्यात मंजूर करण्यात आला होता. हा रोड बनविण्यासाठी नुकताच निधी मंजूर झाला परंतु या रस्त्यावर अनेक घरे मालमत्ता आहेत तर काही प्रमाणत अतिक्रमण झालेले होते.
मनपा आयुक्त आदेशानुसार बुधवारी 19 जानेवारी रोजी मनपा आतरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा अतिक्रमण हटाव पथक किल्ले अर्क परिसरात धडकले आणि सदरील रस्त्यावरील जवळपास 16 मालमत्ता व इतर अतिक्रमणे काढण्याची कारवाई केली. यावेळी काही नगरिकांनी स्वतःहून आप- आपले घर रिकामी करून कारवाई ला सहकार्य केले तर काही नागरिकांनी सुरवातीला कारवाईला विरोध केला. पण प्रशासनाने संबंधित नागरिकांना समजूत काढत कारवाई पार पाडली. या अगोदर 5 जानेवारी रोजी या भागातील बांधीत घर व अतिक्रमणे काढली होती,उर्वरित अतिक्रमण आज 19 जानेवारी रोजी काढण्यात आली.
सदर कारवाई मनपा आतरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या समक्ष मनपा अतिक्रमण हटाव पथकातील पदनिर्देशीत अधिकारी वसंत भोई, इमारत निरीक्षक आर एच रचातवार,पी बी गवळी,मजहर अली, सय्यद जमशेद, सागर श्रेष्ठ, वाहन चालक सय्यद अफजल सह सिटी चौक पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सह पोलीस दलाचे कर्मचारी व मनपा पोलीस व अतिक्रमण हटाव पथकांतील कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.