बोलेरो गाडीचा भीषण अपघात

बोलेरो गाडीचा  भीषण अपघात

 औरंगाबाद /प्रतिनिधी - भराडी येथील ग्राम पंचायत सदस्य प्रदीप दादा गौर यांच्या  (MH :20 BC 6623) बोलेरो गाड़ीचा दि. 29 डिसेंबर  रोजी सकाळी 1:30 च्या सुमारास अपघात झाला . अपघात इतका भीषण होता कि त्यात दोन व्यक्ती जागीच ठार तर ५ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे समजते.

 
  या बाबत अधिक माहिती अशी की, देवदर्शनहुन येतांनी मोहाड़ी ता.  कन्नड  परिसरात देवराज ढाब्याजवळ तांत्रिक बीघाड़ झाल्याने बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीतील प्रदीप गौर (वय 59) व  एक महिला जागीच ठार झाले. तसेच गाडीतील  इतर ५ व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या  घटनेची माहिती  मोहाड़ी येथील ग्रहस्थ काकासाहेब हार्दे यांनी भराड़ी येथे कळवली . माहिती मिळताच भराड़ी येथील पदाधिकाऱ्यानी जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविल्याची माहिती मिळत आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा