मिलिंद कला महाविद्यालयात सात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

मिलिंद कला महाविद्यालयात सात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

औरंगाबाद/ प्रतिनिधी - पीपल्स् एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित  मिलिंद कला महाविद्यालयात पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थ्यांसाठी सात विषयांच्या एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा दि. ९ ते २० मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या.
राज्यशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दि. ९ मार्च २०२३ रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या कार्यशाळेत विवेकानंद महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र शेजूळ यांनी “Constitutional Morality" या विषयावर मार्गदर्शन केले.इतिहास विषयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दि. ११ मार्च २०२३ रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या कार्यशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. बिना शेंगर यांनी "History Curriculum Present & Future In Retrospective of NEP 2020" या विषयावर मार्गदर्शन केले.
मानसशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दि. १४ मार्च २०२३ रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या कार्यशाळेत विवेकानंद महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. महेश मरकड यांनी "Test Construction" या विषयावर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील पीएच.डी. संशोधन केंद्रात संशोधन करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी दि. १६ मार्च २०२३ रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या कार्यशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी "Review of Literature" या विषयावर मार्गदर्शन केले.
पाली आणि बुध्दिझम विषयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यासाठी दि. १७ मार्च २०२३ रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मिलिंद कला महाविद्यालयातील पाली विभागाचे माजी
विभाग प्रमुख डॉ. भन्ते एम. सत्यपाल यांनी “पाली व्याकरण आणि भाषा साहित्य" या विषयावर मार्गदर्शन केले.
इंग्रजी विषयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दि. १८ मार्च २०२३ रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत श्री. मुक्तानंद महाविद्यालय, गंगापुर येथील प्रा. डॉ. अजय देशमुख वbसर सय्यद महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. शेख सुहेल यांनी “Revised Syllabus of Postgraduate Course in English" या विषयावर मार्गदर्शन केले. भूगोल विषयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यासाठी दि. २० मार्च २०२३ रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मदन सुर्यवंशी यांनी “GIS, GPS, Remote Sensing and Geography" या विषयावर
मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान होत्या. या सर्व कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकुल, अंतर्गत मुल्यांकन हमी कक्षाचे संचालक डॉ. फेरोजखान पठाण, पदव्युत्तर विभागाचे समन्वयक डॉ. शंकर गवळी, संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम.जी. शिंदे, डॉ. स्वाती केकरे, डॉ. सतीश खरात, डॉ. वनमाला तडवी यांनी प्रयत्न केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा