ढाब्यावर वाॅचमनला जिवंत जाळले

ढाब्यावर वाॅचमनला जिवंत जाळले

जालना -  जालना-औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजस्थानी ढाब्यावर वाॅचमनला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तुकाराम सखाराम शिंदे असं जिवंत जाळण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती पाेलिसांनी  दिली.
जालना - औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका ढाब्यावर  मध्यरात्री दरम्यान ही घटना घडली आहे. एका शेकोटीवर त्याला टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
सकाळी ही घटना समोर आल्याने परिसारत एकच खळबळ उाडली. या घटनेची माहिती समजताच बघ्यांची  ढाब्यावर गर्दी झाली.  पाेलिस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा