आडगाव सरक येथे आरो प्लांट चे भूमिपूजन
आडगाव सरक / प्रतिनिधी - कोहलर इंडिया लिमिटेड यांच्या आर्थिक सहकार्यातून, अभियान संस्थेच्या सामाजिक प्रेरणेतून, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या योगदानातून औरंगाबाद तालुक्यातील आडगाव सरक येथे आरो प्लांट उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन सरपंच कोमल रिठे कोहलरचे संतोष मोरे, अभियानचे श्रीधर मुळे व भाऊ पठाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रणजित पाटील, नारायण भांबर्डे, श्रीधर मुळे यांची शुद्ध पाणी पिणे यावर समायोचित भाषणे झाली. कै. नीला श्रीधर मुळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व मातोश्री अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यानंतर पाहुण्यांचे स्वागत विविध गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभियानचे भाऊ पठाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी सरपंच किशोर पठाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनीलभाऊ रिठे, ज्ञानेश्वर सोमदे, मीरा पठाडे, विठाबाई दिलीप, राधाबाई काकासाहेब, बाळा त्रिंबक, हरिमामा रिठे, दादाराव पठाडे, गणेश राऊत, भाऊसाहेब मोकळे, भास्कर पठाडे , सुनीताबाई पठाडे, मंडनबाई पठाडे, धोंडाबाई घाईट, सुमनबाई पठाडे, वसंत हिवाळे, दगडू मोकळे, ग्रंथपाल रामेश्वर पठाडे, रुस्तुम पाटोळे, काकासाहेब पठाडे, दिलीप पठाडे, भाऊराव डुगले, ग्राम विकास अधिकारी पडुळ साहेब, कैलाश बारवाल, निलेश कुमावत, आदींनी परिश्रम घेतले.