उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते डोंगरगाव येथील रोहित्रांचे उदघाटन संपन्न
सिल्लोड/प्रतिनिधी - महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे दोन ठिकाणी स्वतंत्र गावठाण डीपी बसविण्यात आल्या. गुरुवार ( दि.3 ) रोजी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते या रोहित्रांचे उदघाटन संपन्न झाले.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने सिल्लोड तालुक्यात वीज सुविधांचे बळकटीकरण करण्याचे काम सुरू आहे. गावकऱ्यांना 24 तास वीज मिळावी तसेच शेतीसाठी देखील सुरळीत वीज पुरवठा व्हावा यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला असून त्या पद्धतीने काम सूरु असल्याची माहिती उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी याप्रसंगी दिली. डोंगरगाव येथील रोहित्रांवर अतिरिक्त दाब येत असल्याने गावात विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकार व सुचनेने गावात दोन ठिकाणी स्वतंत्र गावठाण रोहित्र बसविण्यात आल्याने आता गावात सुरळीत वीज पुरवठा होईल. त्याच बरोबर पूर्वीच्या रोहित्रांवरील दाब कमी झाल्याने आता शेतीसाठी देखील सुरळीत वीज पुरवठा होणार असल्याचे अब्दुल समीर म्हणाले.
यावेळी प.स.सभापती डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, प.स.सदस्य निजाम पठाण, नगरसेवक शंकरराव खांडवे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक मारुती पा. वराडे, युवासेनेचे पदाधिकारी शेख इम्रान ( गुड्डू ) , धैर्यशील तायडे, शिवा टोम्पे, बापू काकडे, सुनील सनान्से, योगेश शिंदे, स्वप्नील शेळके, आनंद सिरसाट, महेश पाटील यांच्यासह माजी सरपंच उमर खा पठाण, कासम पठाण, लक्ष्मण सपकाळ, इम्रान पठाण, दहीगाव सरपंच नाना पांढरे, फारूक पठाण, भागाजी सागरे, शरीफ देशमुख, श्रीराम आगे, अनवर पठाण, जलील पठाण, बुऱ्हाण पठाण, वकील पठाण, कालु देशमुख, सत्तार पठाण, अब्दुल अजीज, हमीद पठाण, हसन पठाण, मगन वाघ,अहेमद पठाण, हमीद हुसेन, सुरेश शेवाळे, सखाराम सागरे आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.