राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
सिल्लोड / प्रतिनिधी - राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सिल्लोड शहरासह तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. गुरुवार ( दि.17 ) रोजी सिल्लोड तहसिल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना पात्र लाभार्थ्यांचा अधिकार असून कुठलाही विलंब न लागता पात्र लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटत करण्याच्या सूचना यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तहसीलदार यांना दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार विक्रमसिंग राजपूत, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, नायब तहसिलदार प्रभाकर गवळी, जि.प.माजी उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक दामूअण्णा गव्हाणे, अशोक सूर्यवंशी, डॉ. मॅचिंद्र पाखरे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार,शिवसेना मतदारसंघ संघटक सुदर्शन अग्रवाल, नगरसेवक शेख सलीम हुसेन, मतीन देशमुख, बबलू पठाण , दीपक अग्रवाल, राजुमिया देशमुख, नानासाहेब रहाटे, कल्याण डवणे, सुभाष जाधव, रघुनाथ कल्याणकर आदींची उपस्थिती होती.
21 हजार रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असणारे तसेच दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.