युवकांना स्वयंरोजगारला उत्तम काळ- किशोर शितोळे
औरंगाबाद / प्रतिनिधी - औरंगबादेतील प्रसिद्ध अशा कनॉट प्लेस येथे नुकत्याच सुरुवात झालेल्या रिद्धि विनायक एंटरप्राइजेस अंतर्गत वन बाईट रेस्टॉरेन्टचे उदघाटन देवगिरी नागरी सहकारी बैंकेचे,अध्यक्ष किशोरदादा शितोळे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले.
देवगिरी बँकेने नेहमीच नवीन उद्दोजकांना प्रोत्साहित केले आहे. आज ही या उदघाटन प्रसंगी किशोरदादा शितोळे यांनी उपस्थित असलेल्या तरुण मंडळीना व नवीन उद्दोजकांना मार्गदर्शन देऊन प्रोत्साहित केले. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरावे, देवगिरी बँक सदैव आपल्या सोबत आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे या व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील योजने अंतर्गत देवगिरी बँकेने अर्थ सहाय्य केले असून व्यवसायास चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळणार असल्याचे वन-बाईटचे संकेत लघाने यांनी सांगितले. या उदघाटन प्रसंगी देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोरदादा शितोळे,देवगिरी बँकेचे टि व्ही सेंटर शाखेचे व्यवस्थापक भरत म्हस्के,अधिकारी प्रसाद मुळे ,वन-बाईट चे संकेत लघाने , विष्णु लघाने यांच्यासह युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थीत होता.