'हे' सहा पदार्थ खा cholesterol असणार कंट्रोलमध्ये, Heart Attack चाही धोका होणार कमी

'हे' सहा पदार्थ खा cholesterol असणार कंट्रोलमध्ये, Heart Attack चाही धोका होणार कमी

हृदयविकाराचा झटका ही आता अत्यंत साधारण गोष्ट झाली आहे. कोलेस्टेरॉलच्या पातळीतील कमी जास्तपणाचा हृदयावर थेट परिणाम पडतो. अर्थात कोलेस्टेरॉलचे हा शरीरातल्या सेल्समध्ये आढळणारा फॅट्ससारखा पदार्थ असतो जो प्रामुख्यानं लिव्हरमध्ये तयार होते.

उत्तम आरोग्यासाठी कोलेस्टेरॉलची खुप महत्त्वाची महत्त्वाची भूमिका आहे. परंतु, रक्तातल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढली, तर कोरोनरी आर्टरी डिसीज होण्याची शक्यता अधिक असते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

रक्तातील हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो त्यासाठी ही पातळी वाढवण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत याविषयी सांगणार आहोत. या पदार्थांमुळे cholesterol कंट्रोलमध्ये असणार पण सोबतच Heart Attack चाही धोका कमी होणार. चला तर जाणून घेऊया.

१. ओटमील

ओटमील हे रक्तातील कोलेस्ट्रोलला कमी करण्यास मदत करत असतात. हे खाल्याने भूक फार लागत नाही, त्यामुळे वजन कमी करताना याचा उपयोग होतो.

२. सीफूड

सीफूडमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण कमी असते याशिवाय प्रोटिन्सचेही प्रमाण यात अधिक असते. ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्, व्हिटॅमिन ए आणि बी व्हिटॅमिन्ससह याचा भरपूर समावेश यात असतो. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

३. लसूण

रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी याशिवाय लसूण मध्ये असणारे गुणधर्म हृदयासाठी लाभकारी असतात. हृदय संबंधी समस्या असणाऱ्या लोकांनी दररोज सकाळी 1 ते 2 बारीक क्रॅश केलेले लसुन खायला हवे.

४. काजू -बदाम

मॅग्नेशियम पोटॅशियम फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी काजूमध्ये असतात तर बदाममध्ये मॅग्नेशियम असते काजू बदाम खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते तसेच रक्तदाबही नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

 ५. ऑलिव्ह ऑइल हार्ट

ऑलिव्ह ऑइल हार्ट हेल्थसाठी गुणकारी मानले जाते. ऑलिव्ह ऑइलमुळे हार्टचे आरोग्य उत्तम राहते आणि कोलेस्टेरॉलची पातळीही कंट्रोलमध्ये राहते.

६. सोयाबीन

सोयाबीनमध्ये चांगले कोलेस्ट्रॉल असते. ह्रदयाच्या आरोग्यासाठी याचा फायदा होतो. सोयाबीनमध्ये असलेल्या लेसीथीनमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहत नाही. म्हणूनच ह्रदयविकार असलेल्या लोकांनी सोयाबीनचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

  

 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा