आ. प्रशांत बंब यांच्याहस्ते ७ कोटी ६ लक्ष रुपयाच्या विकास कामाचे उद्घाटन

आ.  प्रशांत बंब यांच्याहस्ते ७ कोटी ६ लक्ष  रुपयाच्या  विकास कामाचे उद्घाटन

औरंगाबाद / प्रतिनिधी -  शेंदुरवादा सर्कलमध्ये गंगापुर खुलताबाद विधानसभेचे आमदार प्रशांत बंब  यांच्या हस्ते दि. ११ जानेवारी रोजी  ७ कोटी ६ लक्ष रुपयाच्या विविध कामाचे उदघाटन करण्यात आले, यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य किशोर धनायत तालुका अध्यक्ष शिवनाथ मालकर, नंदकुमार गांधिले, मधुकर वालतुरे, सुमित मुंदडा उपस्थित होते. 
      यावेळी बंब यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत एस.एस. २१५ मांडवा तांदुळवाडी ४.८० कि.मी. रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी ९६ लक्ष रुपये एम.डी.आर. शिवपुर ते व्हि.आर. १०८ ३.१४ कि.मी. रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी ६५ लक्ष रुपये, शेंदुरवादा गावात ७४ लक्ष रुपये खर्च करुन गावअंतर्गत पिवर ब्लॉक बसविणे, सामाजिक सभागृह बांधकाम करणे, भुमीगत गटार बांधकाम करणे, सिमेंट रोड. धामोरी गावात गावअंतर्गत सिमेंट रोड १० लक्ष रुपये, धामोरी दर्गा रस्ता मजबुतीकरण करणे २५ लक्ष रुपये, कदीम शहापुर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन कदीम शहापुर फाटा ते गाव रस्ता डांबरीकरण करणे ६२ लक्ष रुपये, गाव अंतर्गत पिवर ब्लॉक बसविणे १० लक्ष रुपये, हायमॉस्ट लाईट बसविणे ३ लक्ष रुपये, दहेगाव गावात २३ लक्ष रुपये खर्च करुन सामाजिक सभागृह बांधकाम करणे, रस्ता खडीकरण, मजबुतीकरण करणे. टेंभापुरी गावात ४८ लक्ष  रुपये खर्च करुन गाव अंतर्गत पिवर ब्लॉक बसविणे १० लक्ष रुपये. जिल्हा परिषद १५ वित्त आयोगातुन भुमीगत गटार बांधकाम करणे ८ लक्ष रुपये, टेंभापुरी - धामोरी रस्तामजबुतीकरण करणे ३० लक्ष रुपये या प्रमाणे विविध कामाचे उदघाटन करण्यात आले.
  यावेळी बोलतांना प्रशांत बंब म्हणाले की, जनतेच्या कामासाठी मी कटीबध्द असुन शेंदुरवादा सर्कलमध्ये खुप मोठ्या प्रमाणात विविध विकास कामाचे उदघाटन आज होत आहे. जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखविला आहे, त्याचे मी प्रामाणिकपणे काम करत आहे. टेंभापुरी धरणात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणी असुन त्या धरणातुन लवकरच दोन पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे, त्यामुळे धरण क्षेत्रातील भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होऊन उत्पन्नात वाढ होईल. डावा कालवा व उजवा कालवा दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आले असुन ते प्रत्यक्षात काम चालु केले आहे. तसेच पोटचाऱ्याची कामे सुरु होणार आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी येणार आहे. त्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी पाणी वाटप संस्थेची स्थापना करुन पाण्याची मागणी संबंधीत विभागाकडे करावी, जेणे करुन शेतात पाणी घेण्यासाठी अडचन येणार नाहीत. कोरोनाचा बिकट काळ असुनही या बिकट परिस्थितीतही मतदार संघात मोठया प्रमाणात निधी आणुन जनतेची मी कामे करत आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी मांडवा तांदुळवाडी या गावातील नागरीकांनी रस्ता कामासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. परंतु तो रस्ता या अगोदर जिल्हा परिषदेकडे होता, त्यानंतर तो रस्ता मी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत बसवुन आज त्याचे प्रत्यक्षात काम सुरु केले आहे, त्यामुळे त्या गावातील नागरीकांना होणारा त्रास हा कमी होणार आहे.

  यावेळी शेंदुरवादा जिल्हा परिषद गटाचे  सदस्य शिवप्रसाद अग्रवाल, पंचायत समिती सदस्य कृष्णा सुकासे, दिपक पढे, अविनाश गायकवाड, रामेश्वर मालुसरे, गोरख शेळके, नवनाथ सुरासे, ज्ञानेश्वर म्हस्के, श्रीमंत चापे, आर्शिवाद रोडगे, गोकुळ म्हैसमाळे, सुनिल मुळे, सुरेश शिंदे, आनंदा निकम, सुखदेव रंधवे, सर्जेराव निकम, अनिल खवले, बद्री राऊत, बाळु निकम, अशोक ढोले, जमिल पटेल, आदिनाथ चापे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास विरगावकर, कल्याण हात्ते, बावीस्कर, तालुका कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा