मनपा निवडणूक.... अन् पदाधिकाऱ्यांचे चेहरे फुलले

मनपा निवडणूक.... अन् पदाधिकाऱ्यांचे चेहरे फुलले

औरंगाबाद / प्रतिनिधी -  महानगरपालिकेच्या प्रभाग रचना संदर्भात समीर राजूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश व्ही रामण्णा, न्यायमूर्ती ए एस बोपन्ना व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सविस्तर सुनावणी झाली. त्यामध्ये मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे  दोन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या मनपा पदाधिकाऱ्यांचे चेहरे फुलले.                     निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक सगळ्यांनीच  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. निर्णयावर नंदकुमार घोडेले यांनी प्रतिक्रिया देत निवडणूक होणार हे निश्चित असे जाहीर केले आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून महापालिकेत प्रशासकिय शासन लागू आहे. त्यातच निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रभाग रचनेच्या वादामुळे न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन निवडणुकीचा मार्ग मोकळा केल्यामुळे निवडणुकीसाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये हर्शोल्हासाचे वातावरण दिसत आहे. जल्लोष साजरा केला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे काटेकोर पालन
सुनावणीदरम्यान नव्याने प्रभाग रचना करण्यात येणार असल्याने याचिकेचा हेतू साध्य झाला असल्याने ती निकाली काढावी, असा युक्तिवाद राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे. Qयाचिका निकाली निघाल्यामुळे आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे काटेकोर पालन राज्य निवडणूक आयोगास करावे लागेल. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना केली असताना गोपनीय माहिती राजकीय पक्षांना पुरवण्यात आली होती. एकंदरच प्रभाग रचनेवर विपरीत परिणाम झालेला आहे. सदर बाब राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयासमोर मान्य केली. सदर याचिकेत याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत, एडवोकेट डी पी पालोदकर, एडवोकेट शशिभूषण आडगावकर यांनी तर, राज्य निवडणूक आयोगातर्फे एडवोकेट अजित कडेठाणकर यांनी काम पाहिले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा