शहरात 65 हजार मद्य परवान्यांचे वाटप बंदोबस्त अपुरा पडणार का?
संभाजीनगर /प्रतिनिधी - थर्टी फर्स्ट म्हटलं की, दारू नृत्य, जल्लोष हेच चित्र डोळ्यासमोर येत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संभाजीनगर शहरातील 65 हजार लोकांनी मद्य पिण्याचे परवाने काढले आहेत. परंतु कधी कधी आनंद साजरा करताना अनेक अपराधीक घटना ही घडतात. अशाच प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी छत्रपती संभाजी नगर मध्ये राज्य उत्पादन शुल्क व पोलीस दलाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. परंतु मद्य परवानाधारक व शहराची लोकसंख्या पाहता ही तयारी अपुरी पडेल हे निश्चित.
65 हजार मद्य परवाने
विशेष सात पथकांची नियुक्ती
संभाजीनगर मध्ये थर्टी फर्स्ट च्या स्वागतासाठी 65 हजार मद्यपिनी परवाने काढले आहेत. त्यामध्ये 55 हजार विदेशी व दहा हजार देशी दारू पिण्याचे परवाने काढण्यात आले आहेत. या काळात अवैध दारू विक्री व अपराधिक घटना टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष सात पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची विशेष नजर मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर राहणार आहे.
पोलीस दलाकडून विशेष तयारी
मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे व धिंगाणा घालणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष तयारी केली आहे. रात्री आठ वाजेपासून सकाळी पाच वाजेपर्यंत शहरात 1200 पोलीस तैनात राहणार आहेत. 68 पेक्षा जास्त संवेदनशील ठिकाने आहेत. यावर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. 50 पेक्षा जास्त वाहनांनी पोलिसांची फिरती गस्त राहणार आहे. गुन्हे शाखेची 10 विशेष पथक तैनात राहणार आहेत. पोलीस उपायुक्त व सहाय्यक आयुक्त हे स्वतः 100 अधिकाऱ्यांसह विशेष लक्ष ठेवणार आहेत.
तयारी अपुरी पडेल
मद्य पिण्यासाठी परवाने 65 हजार लोकांनी काढले आहेत. विनापरवाना मद्य पिणाऱ्यांची संख्या देखील संभाजीनगर मध्ये कमी नाही. त्यामुळे पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेली तयारी कमी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. संभाजीनगर ची लोकसंख्या 37 लाख आहे. फक्त परवानाधारकांचाच विचार केला तरी पोलिसांची संख्या त्यांना आवर घालण्यास अपुरी वाटते लोकसंख्येचा विचार करता पोलिसांची तयारी अतिशय तुटपुंजी वाटते.