मा. ज्योतिबा फुले जयंती निमित्त अभिवादन व शालेय साहित्य वाटप
औरंगाबाद/ प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादुत विद्याश्री दाभाडे (सदाशिवे) यांनी भक्तिनगर येथील "वीणा छताची शाळा" संस्थेत क्रातिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त म. फुले व डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसुर्य महात्मा फुले यांचे समाजकार्य यावर बार्टीच्या औरंगाबाद तालुका समतादुत दाभाडे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांचे खुप मोठे शैक्षणिक हाणी झाली. अनेक शाळांनी आँनलाईन अभ्यास घेतला. माञ त्यांच काय ज्यांना एकवेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी दिवसभर कामाची शोधाशोध करावी लागते. मग मुलांच्या शिक्षणासाठी मोठी महागडी उपकरणं कुठुन घेणार? कोरोणा काळात ब-याच सामाजिक संस्था, संघटना मदतीसाठी धावुन आल्या. त्यातीलच भगवान सदावर्ते सारखा तरूण वाँचमनची ड्युटी करून या मुलांना शिवण्याचं काम करत आहे. महात्मा फुलेंच्या विचारांचा ते ख-या अर्थाने अनुकरण करून त्यांचा वसा पुढे नेत आहेत. सामाजिक जाणिव असलेल्या दाभाडे यांनी या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.