राहुल भारती यांना प्रतिष्ठित ग्लोबल सायबर क्राइम हेल्पलाईन पुरस्कार

राहुल भारती यांना प्रतिष्ठित ग्लोबल सायबर क्राइम हेल्पलाईन पुरस्कार

औरंगाबाद/प्रतिनिधी

शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था, औरंगाबाद येथील कायदा विभागाचेप्रमुख
 सहाय्यक प्राध्यापक राहुल भारती यांना वर्ष २०२१ चा प्रतिष्ठित ग्लोबल सायबर क्राइम
हेल्पलाईन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राहुल भारती हे सायबर कायदा सायबर क्राइम या विषयातील तत्ज्ञ असून त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्याना व पोलीस अधिकारी यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले.  राहुल भारती यांचे सायबर कायदा या विषयावर अनेक संशोधनपर लेख प्रसिध्द आहेत.  त्यांच्या या कार्याची दखल घेत डिजीटल टास्क फोर्स इंडीया यांनी  त्यांना ग्लोबल सायबर क्राइम हेल्पलाईन पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार त्यांना १८ डिसेंबर रोजी पुणे येथील पत्रकार भवन येथे विधान परिषदेच्या उपसभापती  डॉ  निलम गोºहे, अतिरिक्त पोलीस आयुक्त नंदु फडके, डिजीटल आस्क फोर्स चे संस्थापक रोहन न्यायाधिश यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे संचालक डॉ अण्णासाहेब खेमकर आणि प्राध्यपक यांनी त्याचे अभिनंदन केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा