वेल्डींग गॅस स्फोटानंतर जिल्हा प्रशासन हदरले

वेल्डींग गॅस स्फोटानंतर जिल्हा प्रशासन हदरले
स्फोटानंतर सिलेंडरची अशी अवस्था झाली

दहशतवाद विरोधी पथकाकडून पाहाणी

औरंगाबाद/प्रतिनिधी 

वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव (शे.पु.) भागात शनिवारी (दि. १८) झालेल्या गॅस वेल्डींग सिलेंडरच्या भीषण स्फोटानंतर जिल्हा प्रशासन हदरले आहे. आता गॅसवेल्डिंग व्यवसायासाठी नियमावली तयार केली जाणार असून थर्डपार्टीकडून तपासणी केली जाणार आहे. या साठी एक्सप्लोसिव्ह विभागाची मदत घेतली जाणार असून तपासणी दरम्यान दोषी आढळणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी (दि. १९) माहीती दिली. दरम्यान या घटनेची दहशतवाद विरोधी (एटीएस) पथकाकडूनही पाहणी करून काही घातपात असल्याचा कानोसा घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसी भागातील रांजणगाव शेणपुंजी परिसरात भारत गॅस वेल्डींगच्या दुकानात  शनिवारी दुपारी एका दुचाकीला वेल्डिंग करताना झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. मन सुन्न करणाºया या घटनेत भाजलेल्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या भीषण घटनेची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून आता गॅस वेल्डींग व्यवसाय सुरू असलेल्या दुकानांसाठी नव्याने एक नियमावली तयार करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार असून खासगी एजन्सीकडून याची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. त्यात दोषी आढळणाºयांवर कडक कायदेशीर केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. दरम्यान याविभागाशी संबधीत एकही तत्ज्ञ अधिकारी जिल्हाप्रशासनात नसून यासाठी संबंधित विभागाची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान जिल्हाभरात असे जीवघेणे व्यवसायिक किती याची नोंदही जिल्हाप्रशासनाकडे आहे की नाही असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा