कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचे कारण आले समोर

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचे कारण आले समोर

तिसरे आणि महत्त्वाचे मानले जाणारे शाही स्नान आज होते. मौनी अमावस्येला असणाऱ्या या स्नानासाठी लोकांनी एकच गर्दी केली आणि ही गर्दी नियंत्रणा बाहेर गेल्याने येथे चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक भाविकांच्या मृत्यू झाला.आज पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान ही दुर्घटना घडल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षदर्शी नी याची वेगवेगळी करणे सांगितली आहेत.

 ही दुर्घटना घडण्याचे प्रमुख कारण म्हणजे २४ तास आधीच कुंभमेळ्यातील बहुतांशी सेक्टर बंद करण्यात आले होते. सर्व प्रमुख रस्ते बंद असल्याने सेक्टर ११ ते १७ दरम्यान लाखो भाविकांची गर्दी जमली होती.
या गर्दीला बाहेर पडण्यासाठी पुरेसा व योग्य मार्ग उपलब्ध नव्हता. त्यांना बाहेर कसे पडावे याचीही माहिती देण्यात येत नव्हती. यापूर्वी देखील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या त्रिवेणी संगमावर फेरफटका मारला असता, बाहेर पडण्यासाठी वीस ते एकवीस किलोमीटर पायपीट करूनही रस्ता सापडत नव्हता. सर्व रस्ते बंद असल्याने अनेक भाविक त्याच त्याच जागी फिरून येत होते. पोलिसांकडून याबाबत कठोर नियंत्रण ठेवण्यात आले होते. या संदर्भात नेमकी माहिती देण्याची व्यवस्था नसल्याची तक्रार या ठिकाणी उपस्थित असलेल्या नाशिकच्या भाविकांनी दिली आहे.

 प्रत्येक कुंभमेळ्यात तिसरे शाही स्नान सर्वाधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे आखाड्यांच्या शाही स्नानाआधी संगमाचा परिसर बंद केला जातो. परंपरेने ठरलेल्या क्रमाने आखाडा आणि  स्नान करतात.
शाही स्नानानंतरच भाविकांना संगमावर स्नान करण्याची परवानगी दिली जाते. या परवानगीच्या प्रतीक्षेत लाखो भाविक अडकून पडले होते. या गर्दिमुळेच कोंडी होऊन चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

महा कुंभमेळ्यातील प्रयागराज येथे संगमाच्या परिसरात साधू ग्राम उभारण्यात आले आहे. या साधू ग्राममध्ये २१ सेक्टर करण्यात आले आहेत. या २१ सेक्टर पैकी १९ सेक्टर प्रत्येक शाही स्नानाआधी २४ तास बंद केले जातात. कालही पोलिसांनी शाही स्नान सुरळीत पार पाडावे यासाठी हे सेक्टर बंद केले होते.
त्यामुळे भाविकांना संगमाच्या दोन ते तीन किलोमीटर अलीकडे रोखले जात होते. तेथेच त्यांचे स्नान सुरू होते. येथून बाहेर पडताना नेमके बाहेर कुठून पडावे याची योग्य माहिती न मिळाल्याने ही चेंगराचेंगरी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा