मनपाला मिळाले दीड कोटी
औरंगाबाद/ प्रतिनिधी - महापालिकेने नवीन सुधारित महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमानुसार गुंठेवारीधारकांकडून प्रस्ताव मागवले आहेत. आजवर शहरातील 9 झोन मधून आता एकूण जवळपास 65 संचिका आल्या आसून यातून मनपाला 1 कोटी 50 लाख रुपये महसूल मिळाला आहे. असे गुंठेवारी कक्ष अधिकारी संजय चामले यांनी सांगितले.
अधिनियमाप्रमाणे एक जानेवारी २००१ पूर्वीच्या अनाधिकृत गुंठेवारी बांधकाम नियमित करण्याची तरतूद शासनाने केली होती. परंतु आता यात सुधारणा करित शासनाने ही मुदत २०२० पर्यंत केली. याची अंमलबजावणी मनपातर्फे केली जात आहे. या अनुषंगाने स्वतंत्र गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आला. सर्व झोन कार्यालयात गुंठेवारी नियमित करण्याचे अर्ज स्विकरल्या जात आहे. यानंतर अर्जदाराने दिलेला मालमत्तेचा नकाशा व त्याकरिता रेडीरेकनर दराप्रमाणे किती शुल्क आकरल्या जाईल ? यासाठी मनपाचे पथक प्रत्यक्ष पाहणी देखिल करणार आहे. आजवर शहरातील 9 झोन मधून आता एकूण जवळपास 65 संचिका आल्या आहेत. यातून मनपाला 1 कोटी 50 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. यातून मनपाला गुंठेवारी भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येईल. विशेष म्हणजे त्या भागातील रक्कम त्याच भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता वापरली जाणार आहे. असा शासनाचाच नियम आहे. अर्ज अजूनही स्वीकारले जात असून, याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील चामले यांनी केले आहे.