समाजात द्वेष निर्माण करणे पडले महागात अखेर गुन्हा दाखल
औरंगाबाद/प्रतिनिधी - जय श्रीराम म्हणून १५ जणांनी तलवारीने मारल्याची खोटी माहिती प्रसारित करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इम्रान खान रज्जाक खान वय-३७ वर्ष (रा.आलमगीर कॉलनी, रशिदपुरा, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, २८ एप्रिल रोजी रात्री साडेआकराच्या सुमारास टीव्ही सेंटर भागातील प्यासा वाईनशॉप समोर १५ जणांनी हातात तलवारी घेऊन जय श्री राम च्या घोषणा देत मारहाण केल्याचा खोटा व्हिडिओ इम्रान ने सोशल मीडियावर टाकला होता.या मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांनी वेळीच अफवा रोखल्या. व दुसऱ्याच दिवशी खोटा प्रकार असल्याचे समोर आलं. पोलिसांनी सखोल चौकशी करीत आरोपी इम्रान विरोधात विविध कलमाखाली सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.