संसद भवनाजवळ घेतले पेटवून रहस्य दोन पानांच्या चिठ्ठीत
संसद भवनाजवळ एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची घटना घडली. पोलिसांनी जखमी अवस्थेत व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. व्यक्तीची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहे. पोलिसांना घटनास्थळावर पेट्रोलची बाटली मिळाली आहे.
त्याचबरोबर पोलिसांना घटनास्थळावर एक दोन पानांची चिठ्ठी मिळाली आहे. ती अर्धवट जळाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने संसदेच्या जवळ पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी (२५ डिसेंबर २०२४) दुपारी ही घटना घडली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत व्यक्तीला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांपाठोपाठ फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी पोहोचले. व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या ठिकाणी एक पेट्रोलची बॉटल सापडली आहे.
या व्यक्तीने रेल्वे भवनाजवळील पार्कमध्ये आधी पेटवून घेतले आणि नंतर तो संसद भवनाकडे धावत सुटला होता. संसद भवनापर्यंत येईपर्यंत पोलीस आले. पोलिसांनी कपड्याने त्याला झाकले आणि तातडीने रुग्णालयात भरती केले.
पोलिसांना एक दोन पानांची चिठ्ठी सापडली असून, ती अर्धवट जळालेली आहे. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली असून, आता प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव जितेंद्र असून, तो उत्तर प्रदेशातील बागपेटचा आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याचाही तपास सुरू केला आहे.