महापालिकेची धडक कारवाई अतिक्रमण हटवले
औरंगाबाद/ प्रतिनिधी - महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आज शहागंज भागातील भाजी मंडी मधील रस्त्यावर अडथळा, रस्त्यावरील दुकाने,ओटे व इतर गाड्याचे अतिक्रमण काढण्यात आले.
शहागंज भागातील भाजी मार्केट हा 20 फुटाचा रोड असून यावर अनेक दुकानदार आणि हातगाडी चालकांनी अतिक्रमणे केली आहेत. या मुळे रहदारी व खरेदी करिता येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो,यात अनेक छोट मोठे किरकोळ अपघात होत असतात. त्यामुळे हा रस्ता मोकळा करून रहदारी मार्ग खुला करण्यासाठी मनपा प्रशासकीय विभागाच्या अतिक्रमण हटाव पथकाने आज 14 फेब्रुवारी रोजी येथे असलेली दुकाने व दुकाना समोरील ओटे व इतर अतिक्रमण काढण्यात आले.या वेळी मनपा उपायुक्त रवींद्र निकम यांच्या आदेशानुसार, प्रशासकीय पदनिर्देशित अधिकारी वसंत भुई ,इमारत निरीक्षक सायड जमशेद आदींची उपस्थिती होती.