कर्मचाऱ्यांनी का टाकला कचरा रस्त्यावर पहा व्हिडिओ
औरंगाबाद/ प्रतिनिधी - कामगार शक्ती संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांना किमान सुधारित वेतन मिळावे म्हणून मनपातील 9 झोन मधील रेड्डी कॅपनी चा कचरा संकलन व वाहतूक करणारे वाहनचालक व सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते.यात काही कर्मचाऱ्यांनी कचरा गाडीतला संपूर्ण कचरा रस्त्यावर टाकून दिला.
कचरा संकलन करणाऱ्या काही गाड्यांनी मुकुंदवाडी भाजी मंडईत गाडी मधला कचरा भर रस्त्यावर टाकला. या विषयी संघटनेचे गौतम खरात यांना विचारले असता हे कर्मचारी आंदोलनात सहभागी नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले.
कचरा रस्त्यावर टाकने अतिशय चुकीचे आहे. कचऱ्यामुळे रोगराई पसरते. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. कचरा साफ करणाऱ्यांनीच कचरा पसरवला तर शहर स्वच्छ कसे राहणार अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.