सुप्रीम कोर्टाने दिलेले ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडीचेच यश
अंबाजोगाई /प्रतिनिधी - माननीय सुप्रीम कोर्टाने आज ओबीसीना दिलेले २७% आरक्षण हे महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेल्या इंपेरिकल डेटा आणी बांठिया आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर व त्याचाच अभ्यास करून देण्यात आले आहे . त्यामुळे याचे श्रेय हे पुर्णतः महाविकास आघाडी शासनानेच आहे तेव्हा त्याचे श्रेय इतर कोणीही घेऊ नये असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले आहे .
महाविकास आघाडी शासनाने ओबीसी आरक्षणसाठी माजी न्यायमूर्ती बांठिया आयोग नेमला होता . बांठिया आयोगाची शिफारस व महाविकास आघाडी शासनाने गोळा केलेला इंपेरिकल डेटा यांच्यावरून माननीय सुप्रीम कोर्टाने ओबीसींना आज त्यांच्या हक्काचे २७% आरक्षण जाहीर केले . याचा संपूर्ण विजय हा केवळ आणि केवळ महाविकास आघाडी शासनाचाच असल्याने त्याचे श्रेय दुसऱ्या कोणीही घेऊ नये असे स्पष्ट मत राजकिशोर मोदी यांनी मांडले . जर आज मा सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण नाकारले असते तर ओबीसी हा १००% समाज हा राजकारणाच्या प्रवाहापासून दूर ढकलल्या गेला असता असे देखील निरीक्षण राजकिशोर मोदी यांनी नोंदवले . ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी सुरुवाती पासूनच महाविकास आघाडी शासन हे प्रयत्नशील होते . अत्यंत कमी कालावधीत सरकारने इंपेरिकल डेटा गोळा करून तो डेटा मा सुप्रीम कोर्टात दाखल केला व त्याच इंपेरिकल डेटाच्या आधारावरच आज सुप्रीम कोर्टाने ओबीसींना त्यांच्या हक्काचे २७% आरक्षण देऊन एक प्रकारे महाविकास आघाडी शासनाच्या पाठीवर विजयाची थाप मारल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले .
यापूर्वी भाजपच्या सरकारकडून ओबीसी समाजाला झुलवत ठेवण्याचेच काम मागील पाच वर्षात केले . तसेच केंद्र शासनाच्या कडे तयार असलेला इंपेरिकल डेटा हा महाविकास आघाडी शासनाने अनेक वेळा मागूनही दिला नाही . त्यामुळे महाविकास आघाडी शासनाने स्वतः इंपेरिकल डेटा गोळा करून तातडीनं तो मा सुप्रीम कोर्टात दाखल देखील केला आणि त्याच आधारे आज मा सुप्रीम कोर्टाने आज ओबीसींना त्यांचे २७% आरक्षण जाहीर केले .त्यामुळे आजचा विजय हा महाविकास आघाडीचाच असल्याचे मत राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले .