अखेर औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचा प्रभाग आराखडा जाहीर
औरंगाबाद/प्रतिनिधी - औरंगाबाद महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रभाग रचना आराखडा आज 2जून रोजी महापालिकेने जाहीर केला आहे. या आराखड्याचा नकाशा महापालिके बाहेर लावण्यात आला आहे. सात पक्षाप्रमाणे निवडणुकीची वाट पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आराखडा बघण्यासाठी महापालिके बाहेर गर्दी केली आहे.
16जुन पर्यंत या प्रारूप आराखड्यास संदर्भात हरकती आणि सूचना मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. तर 17 तारखेला यासंदर्भात सोनवणे घेण्यात येणार असून 24 तारखेला निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचना आराखडा हरकतसह सादर करण्यात येणार आहे. अंतिम प्रभाग रचना आराखडा 30 जूनला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या आराखड्यानुसार औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 42 प्रभाग प्रत्येक प्रभागांमध्ये तीन वार्ड अशी रचना करण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिका परिसरात 126 वार्ड आणि 42 प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत.