मनपा शाळेचा विद्यार्थी परदेशी भाषेत अव्वल
औरंगाबाद /प्रतिनिधी - मनपा केंद्रीय शाळा हर्सूल येथील वर्ग ५ वी ते ७ वी गटातील विद्यार्थी डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या फ्रेंच भाषा परीक्षेत देशात अव्वल आल्यामुळे मनपा शिक्षण विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आज संगणक क्रांतीमुळे सारे जग जवळ आले आहे. विद्यार्थ्याना जागतिक संधी उपलब्ध व्हावी यासाठी फॉरेन लँग्वेज असोसिएशन शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लँग्वेज कोर्स राबविते . याच पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या फ्रेंच भाषा परीक्षेत मनपा केंद्रीय शाळा हर्सूल येथील वर्ग ५ वी ते ७ वी गटातील आर्यन अंकुश राजगुरे याने देशात अकरावा क्रमांक आणि जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकविला आहे.यामुळे मनपा शिक्षण विभागाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. त्याच्या या यशाबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी उपायुक्त तथा शिक्षण विभागप्रमुख श्रीमती नंदा गायकवाड ,शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी अभिनंदन केले आहे . विस्तार अधिकारी रामनाथ थोरे ,भरत तीनगोटे आणि केंद्रीय मुख्याध्यापिका श्रीमती उर्मिला लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल येथे संजय कुलकर्णी आणि सर्व शिक्षकवृंद परदेशी भाषा उपक्रम राबवित आहे .अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. याप्रसंगी शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी सर्वच महानगरपालिकेतील शाळेमध्ये गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात येत आहे.
यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची गर्दी होणार आहे.
असे सांगितले.