विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुध्द व थंड पाण्याची व्यवस्था करा - अभाविप

विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुध्द व थंड पाण्याची व्यवस्था करा - अभाविप

औरंगाबाद/ प्रतिनिधी- एकीकडे कडाक्याचा उन्हाळा सुरू असून उन्हाचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे, यामुळेच जीव पाणी-पाणी करू लागला आहे आणि अशाच भर उन्हाळ्याच्या दिवसात विद्यापीठ विभागातील विद्यार्थ्यांची पिण्याच्या  पाण्याची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी विभागांमध्ये पाणी उपलब्ध नाही, विद्यापीठांमध्ये पाणी फ्रीजर उपलब्ध आहेत पण त्या फ्रीजरमध्ये पाणीच उपलब्ध नाही अशा वेळी विद्यार्थ्यांना एका विभागातून दुसऱ्या विभागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा जीव अतिशय मेटाकुटीला येत आहे. ही बाब लक्षात घेऊन तात्काळ विद्यापिठ प्रशासनाने सर्व विभागांमध्ये पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा अभाविप तिव्र आंदोलन करेल अशा मागणीचे निवेदन कुलसचिव  डॉ. जयश्री सूर्यवंशी यांना अभाविपच्या वतीने  देण्यात आले.
यावेळी अभाविप महानगरमंत्री नागेश गलांडे, रणजित खटके, माधव शिंदे सह अन्य विविध विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा