पैठण तालुक्यात चोरांचा हैदोस

पैठण तालुक्यात चोरांचा हैदोस

४५ हजार रोख रकमेसह आडीज तोळे सोने  लंपास 

पैठण /प्रतिनिधी - तालुक्यातील आपेगाव येथे चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घालत आकाश कापसे यांच्या घरातील किचनमध्ये प्रवेश करून ४५ हजार रोख  रकमेसह आडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवार रोजी घडल्याने परिसरात चोरांची दहशत निर्माण झाली असून नागरिकात भितीचे वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे हि एकाच आठवड्यातील दुसरी चोरीची घटना आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की ,पैठण तालुक्यातील आपेगाव येथे आकाश विलास कापसे हे दि.२७  रोजी  आपल्या राहत्याघरी नियमितपणे रात्री साडे आकरा वाजे दरम्यान समोरच्या खोलीत झोपले होते .
            सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास आकाशची आई झोपेतून उठून किचनकडे गेली असता किचनचे कुलूप तुटलेले व सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आल्याने आईने आकाशकडे धाव घेवून त्याला उठवले.  आकाशने किचनकडे जावून बघितले असता तांदुळाच्या डब्यातील रोख रकम ४५ हजार रूपयासह अडीच तोळे सोने असा एकूण ९५ हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास झाला असल्याचे निदर्शनास आल्याने आकाशने पैठण पोलिसात धाव घेवून तक्रार दिली.  पोनि किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोनि रामकृष्ण सागडेसह फौजफाटा घटनास्थळी पोहचला . पाहणी करून श्वान पथक व ठसे तज्ञाना पाचारन करण्यात आले. पथकातील श्वानने घटनास्थळावरून पाचशे मिटर पर्यंत सुगावा लावण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच निष्पन्न झाले नाही .पुढील तपास पोनि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोनि सागडे करीत आहेत 
   दरम्यान आपेगाव येथे हि एकाच आठवड्यातील  दुसरी घटना असल्याने परिसरात चोरट्यांची दहशत कायम असून चोरांना पकडण्याचे पोलिसासमोर  मोठे अवाहन उभे राहिले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरांचा शोध घेवून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे 

पन्नालाल नगर येथे चोरीचा डाव फसला 
पैठण येथे गेल्या आठवड्यात  पन्नालाल नगर येथे पाच आज्ञात चोरांनी रात्री एका घरात चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला होता . मात्र घर मालक जागे असल्याने चोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला असल्याचे चित्र सिसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रसारीत होतांना पहावयास मिळत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा