तुम्ही हाक द्या आम्ही साथ देवू : शहराध्यक्ष दत्ता भांगे

तुम्ही हाक द्या आम्ही साथ देवू : शहराध्यक्ष दत्ता भांगे

औरंगाबाद / प्रतिनिधी
आज काही पक्ष जातीय तेढ निर्माण करून सर्व सामान्य जनतेला संभ्रमात ठेवण्याचे काम सध्या औरंगाबाद शहरात चालू आहे. जनतेच्या समस्यांशी अशा पक्षाला काही घेणं देणं नाही. अशा लोकप्रतिनिधींना येत्या महानगर पालिका निवडणुकीत त्यांची ‌जागा दाखवा. तुम्ही हाक द्या आम्ही तुम्हाला साथ देवू असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे औरंगाबाद शहराध्यक्ष अ‍ॅड. दत्ता भांगे यांनी न्यायनगर येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवनिर्वाचित पदाधिकाºयांच्या सत्कार समारंभात केले. 
यावेळी शहर कार्याध्यक्ष कय्युम शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जनतेच्या समस्या मांडण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. तुमच्या वाडार्तील कोणतीही समस्या असूद्या आम्ही स्वत: हून लोकप्रतिनिधी असो किंवा अधिकारी असो ती समस्या सुटेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. सर्व सामान्य जनतेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दार सदैव खुले आहे असे यावेळी कार्याध्यक्ष कय्युम शेख यांनी सांगितले.
 यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित शहर सरचिटणीस नवीद शेख, शहर संघटक, कय्युम कुरैशी, शहर सरचिटणीस प्रतिक बनकर यांचा शहराध्यक्ष अ‍ॅड. दत्ता भांगे, कार्याध्यक्ष कय्युम शेख यांनी सत्कार केला. यावेळी पश्चिम विधानसभा अध्यक्ष यासेर खान, मध्य विधानसभा अध्यक्ष जुबेर खान, मध्य विधानसभा कार्याध्यक्ष इस्माईल राजा, शहर उपाध्यक्ष वसीम मनियार, शहर उपाध्यक्ष मिलिंद जमधाडे, युवा नेते अफरोज पटेल, शहर सरचिटणीस रमेश घाडगे, मतीन शेख, सचिन नवघरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी न्यायनगर मित्र परिवाराने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन नवघरे यांनी व्यक्त केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा