आजच रजिस्ट्रेशन करा पीएम मातृत्व वंदन योजनेसाठी आणि मिळवा 6000
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ज्या प्रकारे शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात त्याचप्रमाणे महिलांसाठीही अशी एक विशेष योजना असून त्यामाध्यमातून त्यांना 6000 रुपये आर्थिक मदत मिळण्याची व्यवस्था केली जाते. देशातील दुर्बल घटक, महिला आणि इतर घटकांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून या योजना राबवल्या जातात. पीएम मातृत्व वंदन योजना असं या योजनेचं नाव आहे.
महिलांना मिळतात 6000 रुपये
केंद्र सरकारने पीएम मातृत्व वंदन योजना ही योजना केवळ महिलांसाठी राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना 6000 रुपये मिळतात. गर्भवती असलेल्या तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत म्हणून 1 जानेवारी 2017 साली ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला प्रधानमंत्री गर्भावस्था सहाय्यता योजना या नावानेही ओळखले जाते. या योजनेसाठी गर्भवती महिला अर्ज करु शकतात.
या योजनेसाठी ही कागदपत्रे आवश्यक
आई-वडिलांचे आधार कार्ड
आई-वडिलांचे ओळखपत्र
मुलाच्या जन्माचे प्रमाणपत्र
बँक खात्याचे पासबुक
कशा पद्धतीने पैसे मिळतील?
या योजनेचा उद्देश हा आई आणि मुल या दोघांची काळजी घेणे हा आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही मदत तीन टप्प्यात दिली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये 1000 रुपये तर दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये देण्यात येतात. तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये देण्यात येतात. मुलाचा जन्म झाल्यानंतर 1000 रुपये देण्यात येतात.
या वेबसाईटला भेट द्या
पीएम मातृत्व वंदन योजना (PMMVY Scheme) या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या वेबसाईटला भेट द्या.