सिडको हड़को माहेश्वरी मंडळा तर्फे सामूहिक गणगौर उजवना
औरंगाबाद/ प्रतिनिधी - गणगौर निमित्य सिडको हड़को माहेश्वरी महिला मंडळा तर्फे भव्य 22 सामूहिक गणगौर उजवना ब्लू बेल्स क्लब हाउस येथे यशस्वी रीत्या संपन्न झाली.
औरंगाबाद च्या इतिहासत प्रथमच एवढया मोठ्या प्रमाणात 22 ऊजवने म्हनजे जवळपास 400 गोरण्या एकत्र जेवल्या अशी माहिती मंडळा च्या सेक्रेटरी प्रिती झवर यानीं दिली.
यावेळी मंडळा च्या अध्यक्ष सुवर्णा बाहेती यानीं सांगितले की आम्हाला खंत आहे की आम्हाला एंट्रीज थांबवाव्या लागल्या त्या बद्दल आम्ही क्षमस्व आहोत. संपूर्ण औरंगाबाद मधुन आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला.
गणगौर ला मारवाड़ी समाजात अनन्य साधारण महत्व आहे, होळीच्या सातव्या दिवशी शीतला माता ची पूजा करून घट स्थापना होते यादरम्यान गीत गाऊन आनंद उत्सव साजरा केला जातो, सिंजारा ला वाजत गाजत गणगौर ची मीरवनूक निघते व दूसऱ्या दिवशी सोळा श्रृंगार करूंन सुहासिनी गणगौर ची पूजा करतात व त्या दिवशीच ऊजवने केले जातात.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुवर्णा बाहेती, सेक्रेटरी प्रिती झवर, कोषाध्यक्ष डॉ पदमा तोष्णीवाल, उपाध्यक्ष संगीता लड्ढा, नैना भूतड़ा, सरिता लड्ढा ,कीर्ति नागोरी, मधु करवा, सुलोचना जाजू, रमा नावंदर ,डॉ ज्योति भाला, अनुराधा मुंदड़ा, अर्चना मुंदड़ा, चंदा सोनी ,पल्लवी कोठारी ,डॉ सविता राठी, प्रतिमा मंत्री नीलिमा सारडा, तृप्ति सोनी, सोनाली सारडा यानीं परिश्रम घेतले.